आंदोलनावरुन आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

26

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.2एप्रिल):-सटी महामंडळातील चालक व वाहकांना मुंबईला पाठविण्याच्या निर्णयाच्या विरोधात आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेडजवळ बस अडवून अंदोलन केलं. या आंदोलनावरुन आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत आमदार गुट्टे यांनी जन हितार्थ असे शेकडो गुन्हे दाखल झाले तरी मला त्याची पर्वा नाही असे रोखठोक मत व्यक्त केले आहे.
एसटी महामंडळातील ठराविक चालक व वाहकांना मुंबईत बेस्टची सेवा देण्यासाठी पंधरा दिवसासाठी पाठविण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील कर्मचारी मुंबईत गेल्यनंतर मुंबईमधल्या लोकांच्या संपर्कात येतात.

सध्या देशात सर्वाधिक कोरोनाची रुग्णंसख्या मुंबईत असल्यानं त्या ठिकाणी कोरोनाचा फैलावही मोठा असून यापूर्वी गंगाखेड येथून पाठवण्यात आलेले अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते आणि पाठवण्यात येणारे इतर कर्मचारी बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेथील सेवा बजावल्यानंतर ते पुन्हा परभणी जिल्ह्यात सेवा बजावतात या दरम्यान अनेकांच्या संपर्कात ते येत असल्याने काही बाधित झालेल्या कर्मचाऱ्या पासून कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून आपण वारंवार प्रशासनाला सांगूनही त्याचा उपयोग न झाल्याने आपण ही बस रोखली. या बाबत आपणावर गंगाखेड पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली. जनहितासाठी असे एक नाही तर शेकडो गुन्हे दाखल झाले तरी मला त्याची पर्वा नाही असे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले.