पुसद येथील आयकॉन कॉल सेंटरचे दर गेले नियंत्रणाबाहेर

23

🔹रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट: संबंधित आरोग्य विभागाने घेतले द्रृतराष्ट्राचे सोंग

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.2एप्रिल):-शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गजन्य महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या व मृत्यू -दर दिवसेंदिवस वाढतअसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचाच फायदा उचलत शहरातील काही खाजगी कोविड सेंटर हॉस्पिटल ने रुग्णांची आर्थिक लूट चालवली आहे.चार ते पाच दिवसाच्या उपचारासाठी लाखो रुपये देयक आकारल्या जात आहे. हे दर प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याची दिसून येत आहे यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. याबाबतची तक्रार संबंधित प्रशासनाकडे करुन सुद्धा संबंधित आरोग्य प्रशासन दृतराष्ट्राचे घेऊन बसले आहेत.तालुक्यात कोबी उपचारासाठी शासनाने शासकीय व खाजगी व्यवस्था उपलब्ध करून दिले आहे.गोरगरीब नागरिकांना शासकीय उपचारा शिवाय पर्याय नाही परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती किंवा शासकीय सेवेत उपचार बरोबर न मिळाल्याने गोरगरीब जनता ही या खाजगी कोविंड सेंटर कडे वळत आहे.

कोरोना लसीकरणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने पुसद तालुक्यातील काही खाजगी रुग्णालयांत
केंद्र सरकारची आयुष्मान भारत जन आरोग्य योजना व महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनेचे लाभ देणाऱ्या खाजगी रुग्णालयांची कोविड सेंटर ची निवड केली आहे.
त्यापैकी पुसद येथील आयकॉन हॉस्पिटल हे खाजगी कोविड सेंटर असून याचे संचालक शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून नागरिकांची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना एका लसीकरणाच्या डोससाठी रुग्णांना २५० रुपया एवजी ४५० व प्रमाणपत्रासाठी अधिक १० रुपये असे आवाचे सव्वा दामदुप्पट बिल आकारले जात आहे.तर आयकॉन हॉस्पिटल मध्ये साध्या एका रूमचे ४०००/ हजार रुपये तर पीपीई किटचे ६००/ रुपये असे एकूण ४६००/ हजार रुपये प्रत्येक दिवसाचे भाडे आकारण्यात येत आहे. तर आयसीयू विना व्हेंटिलेटरचे ७५००/व पीपीई किटचे१२००/असे एकूण ८७००/ रुपये प्रत्येक दिवसाचे भाडे आकारले जात आहे. तर आय सी यु प्लस व्हेंटिलेटर ९०००/हजार रुपये व पीपीई किट १२००/हजार रुपये एका दिवसाचे एका रूमचे रुग्णासाठी भाडे केले जात आहे.

वास्तविक पाहता डॉक्टर चार्जेस, मॉनिटर, नर्सिंग, जेवण, एक वेळचा नाश्ता, बेड,ईसीजी, एक्स-रे, सर्वसाधारण रक्तचाचण्या सीबीसी, एच आय व्ही, बी एस ए जी, शुगर, सोनोग्राफी , या सर्व बाबी भरती असलेल्या रुग्णाला त्याच खर्चामध्ये समाविष्ट करावे लागतात. परंतु वरून या खाजगी कोविड सेंटर आयकॉन हॉस्पिटलचे संचालक जाणीवपूर्वक रुग्णाला दामदुप्पट चार्ज करून नाहक माणसिक त्रास देत आहेत त्यामुळे या खाजगी कोविड सेंटर रुग्णालयाने उपचारासाठी दाम दुप्पट पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे लाखो रुपयांचे बिल रुग्णाच्या नातेवाईकाच्या हातात पडत असल्यामुळे नातेवाईकांना पळता भुई थोडी झाली आहे. या खाजगी कोविड सेंटर आयकॉन हॉस्पिटल मधे रुग्णाची लूट थांबवण्यासाठी संबंधित आरोग्य विभागाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी व खाजगी रुग्णालयात रुग्णाच्या सेवेकरिता व तक्रार करण्याकरिता प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक ई-मेल आयडी आधी जाहीर करण्यात यावा व याखाजगी रुग्णालयावर एखाद्या लेखापरीक्षकाची नेमणूक करावी व रुग्णालयात येणारे रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी त्यांना देण्यात येणारे बिल रुग्णालयातील गरिबासाठी आणि अन्य खाटाची उपलब्धता यावर बारकाईने लक्ष ठेवावे व या खाजगी कोविड सेंटर रुग्णालयात आजपर्यंत उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांची बिलाबाबत खाजगी कोविड सेंटरचे बिल बुक रजिस्टरचे लेखापरीक्षण करून पडताळणी करण्यात यावी व पडताळणी अंती खाजगी कोविड सेंटर आयकॉन हॉस्पिटल ने रुग्णालयात आकारलेल्या ज्यादा बिलाची रक्कम संबंधित रुग्णांना तात्काळ परत करावी व रुग्णालयात उपचार घेतलेल्या सर्व बिलाची तात्काळ तपासणी करण्याचे आदेश जारी करून या खाजगी कोविड सेंटर आयकॉन हॉस्पिटल व संचालकाची सखोल चौकशी करून सात दिवसाच्या आत परवाना रद्द करावा व आयकॉन हॉस्पिटल कोवाड सेंटरच्या बाजूलाच हॉस्पिटल मधील वेस्ट साहित्य मेडिकल औषधी पाकिटे इंजेक्शन पाकिटे हॅन्ड ग्लोज असे वेस्ट मेडिकल मटेरियल फेकत असल्यामुळे आजूबाजूला दुर्गंधी पसरत आहे.

अशा आशयाची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी दि. मार्च २०२१ रोजी आरोग्यमंत्री व जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे परंतु आजपर्यंत संबंधित प्रशासनाने रुग्णांची लूट करणाऱ्या आयकॉन हॉस्पिटल खाजगी कोविड सेंटर वर कुठल्याही प्रकारे कारवाई नकेल्यामुळे या खाजगी कोविड सेंटरचे संचालकां सोबत संबंधित आरोग्य विभागातील अधिकारी यांचे साटेलोटे आहे की काय.? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे त्यामुळे सदर आयकॉन हॉस्पिटल खाजगी कोविड सेंटर वर तात्काळ कारवाई करावी अशी तक्रार करण्याची मागणी आहे ही कारवाई १५ दिवसाच्या आत करण्यात आली नाहीतर लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा तक्रार करते सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.