अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे संसार उध्वस्त

66
✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.3एप्रिल):- देगलूर तालुक्यातील कोकलगाव येथील जिवबा दादाराव गणपतराव यांनी दुपारच्या वेळेस आपल्या शेतातील धूरे जाळत असताना अचानक रौद्ररूप धारण केलेले जाळ शेतातील जनावरांच्या गोठ्याला जाळ लागून त्यामधील एक म्हैस,एक गोरं जागीच जळून राख झाले व दोन बैलाचे डोळे व शेपूट जळून खाक झालेला आहे.त्या गोठ्यात दहा क्विंटल ज्वारी व शेतातील औजारे जळाले आहेत.

यामध्ये या शेतकऱ्याचे किमान दोन ते अडीच लाखाचा नुकसान झाल्यामुळे या शेतकऱ्यासमोर जगावे की मरावे असेच विचार येत आहेत.एक वर्षापासून कोरोना महामारीने त्रस्त झालेले असतानाच अशा मोठ्या संकटाने शेतकरी हतबल होऊन गेला आहे.या घटनेने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करीत आहे.तरी या घटनेचा पंचनामा तात्काळ करून या शेतकऱ्याला मदतीचा आधार देण्यात यावे.असे येथील नागरिक बोलत आहेत.