✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

मनमाड(दि.3एप्रिल):- येथील हनुमान नगर भागातील राहणाऱ्या सोनिता नामदेव अहिरे (वय,४३)हिस पती नामदेव श्यामराव अहिरे (वय,५०) याने धारदार शस्त्राने डोक्यात वार करून पत्नीला जिवंत ठार केले तर पतीनेही स्वत:च्या पोटात धारदार शस्त्र खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना हनुमान नगर भागात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  याबाबत समजलेली माहिती अशी की हनुमान नगर भागात अहिरे कुटुंब हे गेल्या अनेक दिवसापासून वास्तव्यास आहे. त्यांच्यात अनेक वेळा असे वाद होत होते.मात्र आज दुपारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान नामदेव अहिरे आणि पत्नी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले या भांडणात नामदेव अहिरे यांने आपली पत्नी सुनिता नामदेव अहिरे हिच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला.यावेळी ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यावेळी शेजारी व आपल्या मुलानी तिथे धावून आले. ताबडतोबीने तिला मालेगाव येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली.

तर पती नामदेव यानेही स्वतःच्या पोटात धारदार शस्त्र खुपसून आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न केल्याची माहिती समोर आली असून सदर घटना ही चारित्र्याच्या संशयावरून घडली असून भांडण झाले त्यावेळी पती नामदेव हा काहीतरी नशेत होता अशी अशी चर्चा सुरू आहे.याची माहिती मनमाड पोलिस स्टेशनचे निरीक्षक पी.बी.गीते यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी रवाना केले.नामदेव हा ही जखमी झाला असल्याने त्यास धुळे येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती मनमाड पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिली असून खरा काय प्रकार आहे तो नामदेव शुद्धीवर आल्यावर समजेल अशी माहिती दिली असताना पुढील तपास पोलिस करीत आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED