🔹बीडचे सामाजिक न्याय मंत्री असताना दोन वर्षांपासून रमाई योजना रखडलेली

🔸पालकमंत्री साहेब 14 एप्रिल पर्यंत रमाई घरकूल निधी उपलब्ध करून द्या, मागासवर्गीय लाभार्थ्यां मध्ये आनंदाचे वातावरण होईल

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.3एप्रिल):- राज्य सरकारच्या वतीने मागासवर्गीय लोकांकरिता रमाई अवास योजना राबविली जाते या मध्ये गोरगरीब लोकांचा विचार करून ज्या लोकांकडे पक्की घरे नाहीत अशा लोकांना या घरकुल योजने अंतर्गत घरकुल दिले जाते या मध्ये दोन वर्षा पूर्वी बीड जिल्ह्यातून सर्वात जास्त अर्ज दाखल करण्यात आले होते त्या मध्ये परळी तालुक्यातून सर्वात जास्त मंजूर झालेले घरकुल दिसून आले आहेत परंतु ती मजुरी केवळ कागदावरच असून त्याचा निधी मात्र अजून उपलब्ध झालेला नाही अशी प्रतिक्रिया एम आय एम शहराध्यक्ष अकबर कच्छी यांनी दिली आहे या आधी परळी शहरात नगर परिषद अंतर्गत पहिला टप्पा 124 घरकुल मजूर झाले होते त्यामधील काही घरकुल अजून सुद्धा पूर्ण झालेली नाहीत त्या नंतर 93 घरकुल मजुरी मिळाली.

त्या मध्ये सुद्धा काही प्रमाणात घरकुल राहिले आहेत तर नवीन टप्पा 207 व 216 असे मिळून 423 घरकुल मजूर होऊन जवळपास एक दिड वर्षे झाले असून या योजनेचा अजून सुद्धा निधी उपलब्ध झालेला नाही म्हणून ही योजना जवळ जवळ दिन वर्षापासून निधी विना अपुरी राहिलेली आहे तेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे साहेब यांनी 14 एप्रिल पर्यत निधी उपलब्ध करून या लाभार्त्याचा आनंद द्विगुणीत करावा अशी भावना लोकांमध्ये होत असून माझ्या पर्यत आलेले आहे.

तेव्ह सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी लोकांची भावना मागासवर्गीय लाभार्थी याच्या भावनांची दखल घेऊन हा निधी उपलब्ध करून घ्यावा अशी अपेक्षा आहे असे म्हणाले आहेत कारण ही घरकुल योजना गोरगरीब व मागासवर्गीय लोकांकरिता आहे त्याच्या अपेक्षा आपल्यावर खूप आहेत आपण या खात्याचे मंत्री असताना हा निधी का उपलब्ध होत नाही असे एम आय एम परळी शहराध्यक्ष अकबर कच्छी यांनी म्हंटले आहे तेव्हा पालकमंत्री साहेब यांनी हा निधी उपलब्ध करून या मागासवर्गीय लाभार्थींचा आनंद 14 एप्रिल पर्यंत द्विगुनित करावा असे ते पुढे म्हणाले आहेत

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED