✒️चांदू आंबटवाड(नायगाव तालुका प्रतिनिधी)मो:;9307896949

कुंटूर(दि.3एप्रिल):- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात
काल दिनांक 1 एप्रिल पासून कोव्हिड-19 ची लस देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला सरपंच प्रतिनिधी मारोतराव पा. कदम यांच्या हस्ते फीत कापुन सुरुवात करण्यात आली या वेळी ग्रामसेवक राजेश दमकोंडवार, वैद्यकीय अधिकारी डाँ.सोनावणे व त्यांचा संपुर्ण स्टाँप व गावातील नागरिक हजर होते. कुंटूर येथील नागरिकांनी या अभियानास समिश्र प्रतिसाद देत दिवसभरात केवळ 35 लोकांनीच लस घेतली.

या लसी संदर्भात लोकांच्या मनातील गैरसमज व भिती घालवण्याच्या उद्देशाने आज कुंटूर चे सरपंच,उप सरपंच शिवाजी पा.होळकर, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण पा.आडकिणे,ग्रामसेवक राजेश दमकोंडवार, क्लार्क शिवाजी रेनेवाड व ग्रा.पं.सस्य यांनी ध्वनीप्रेक्षेपना च्या माध्यमातून व डोअर टू डोअर जाउन 45 वर्षा वरील व्यक्तीला ही लस सुरक्षित असल्याचे महत्त्व पटवुन दिले.

ग्रामपंचायत देखील कुंटूर वासीयाचे आरोग्य अबाधित रहावे ह्या हेतूने व कोरोना चा फैलाव होऊ नये या उद्देशाने ध्वनीप्रेक्षेपनाच्या साह्याने जनजागृती करणे, गावात सोडीयम हायपो क्लोराईड ची फवारणी करणे व मास्क – सँनिटायझरचा वापर करून सोशल. डिस्टंसींगचे महत्त्व पटवून देत आहेत.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED