वसुली जोमात वीज मात्र कोमात

26

🔸नितीन राऊत यांचा फाजील आत्मविश्वास महाविकास आघाडीला घेवून बुडणार

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.3एप्रिल):-महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानुसार राज्यात वीजबिल वसुली चालू आहे.
शेतकर्यांनी सावकारांकडून कर्ज काढून स्वताच्या बायकांचे मंगळसूत्र गहाण ठेवून,कृषी पंपाची बिले भरली आहेत, पण वीजपुरवठा अजूनही सुरळीत केला जात नाही. मग आणखी नितीन राऊत हे अजुन कशाची वाट पाहत आहेत. हेच समजत नाही. सध्या शेतकर्यांचे पैसे नाहीत मग वीजबिल भरायचे कसे मग शेतकरी खाजगी सावकारांपुढे हात पसरावे लागत आहेत.हे सावकार शेतकर्यांच्या जमिनी लिहुन घेत आहेत. शेतकर्यांना कर्जबाजारी करण्याचे पाप हे महाविकास आघाडी सरकार करत आहे.

ऐन उन्हाळ्यात या जुलमी सरकारने शेतकर्यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.* त्यातच भर म्हणून की काय हे महावितरणचे उध्दट अधिकारी वीजबिल भरूनही वीजपुरवठा सुरळीत करत नाहीत. वीजपुरवठ्याविषयी विचारणा केली असता, महावितरणचे अधिकारी शेतकर्यांना उध्दटपणे बोलत आहेत. राज्यात वीजबिल वसुली जोमात सुरू आहे, पण वीजपुरवठा मात्र कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना च्या नावाखाली गेल्या वर्षभरात शेतकर्यांना व्यापार्यांनी लुटले , ते कमी की काय म्हणून हे तीन पायाचे सरकार शेतकर्यांच्या पाठी लागले आहे. *जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात नितीन राऊत यांचा फाजील आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणि काँग्रेस या पक्षांचे महाराष्ट्रातील अस्तित्वच धोक्यात आणण्यासाठी कारणीभूत ठरेल*