स्त्रीत्वाची झूल

25

लहानपणी अबोध कन्या
मुलीने मुलीसारखे वागायचे.
आई वडिलांचे ऐकायचे….
मुलीची जात असल्यामुळे
कन्यारेषा पाळत राहिले
मुलगी म्हणून जगत गेले!….

विवाह बंधनात अडकले.
पतीरांजाचा हुकुम मानत राहिले.
त्यांचेच घर, त्यांची मर्जी
त्यांच्याकडे लक्ष देऊन
त्यांना सर्वस्व मानून
स्त्री म्हणून जगले!…

सार्‍याच्या आवडी निवडी
जीवनात जपता जपता
आयुष्य जगायचे विसरले.
मुलांसाठी आनंदात जगता जगता
संसारात आनंदक्षण फुलवत
स्त्रीपण अंगावर ओढून जगले!…

आता दुसर्‍याच्या मनाची
काळजी करत करत
ओठ गच्च मिटूनमुळमुळीत
वागायच नाही ठरवलं!
घर संसार सांभाळता सांभाळता
स्वतःचे व्यक्तीमत्व हरवलं
स्वतःचे अस्तित्व हरवलं !…

मनातून जाणवायला लागले
मनाला प्रश्न सतावू लागले
तू फक्त घरासाठी जगतेस .
तू तुझ्याकरिता जगतेस कां?
तू फक्त स्त्री म्हणून जगतेस!
पुरुषनिर्मित कायद्याप्रमाणे वागते!

कां हा स्त्रीपुरुष भेदभाव?
कां स्त्री दुर्लक्षित होते?
कां तिला दुय्यम वागणूक मिळते?
स्त्रित्वाची पांघरलेली झूल फेकून दे.
तू पुरूषासारखी जग.
मानवी जीवन जग !

✒️जयदिप लौखे-मराठे, वेल्हाणे धुळे)