प्रा. डॉ. बालाजी साबळे यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता

62

✒️सिरसाळा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिरसाळा(दि.3एप्रिल):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद कडून प्रा.डाॅ. बालाजी साबळे यांना अर्थशास्त्र विषयाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय शिरसाळा ता. परळी वैजनाथ जी. बीड येथे सहाय्यक प्राध्यापक व अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत.

नोव्हेंबर 2017 साली प्रोफेसर डॉ. शंकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अर्थशास्त्र विषयातील संशोधन कार्य पूर्ण केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्याकडून त्यांना पी.एच.डी प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, परिषदांमधून शोधनिबंधाचे वाचन त्यांनी केले आहे .अनेक शोधनिबंध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल मधून प्रकाशित झाले आहेत.

आता संशोधक मार्गदर्शक म्हणून कार्य करण्यासाठी नवे दालन खुले झाल्यामुळे रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार व्यंकटरावजी कदम, प्रोफेसर तथा सिनेट सदस्य डॉ एम् बी धोंडगे, श्री पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एच.पी.कदम, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच प्राचार्य डॉ आर के. इप्पर, अँड. दिलीप उजगरे प्रा. डॉ. माधव रोडे डॉ. विनोद गायकवाड डॉ राजकुमार जोशी डॉ. विनोद जगतकर डॉ. मेश्राम डॉ.जगतकर डॉ. गाजभरे पत्रकार प्रा. रोडे इत्यादी मित्रपरिवार या सर्वांकडून त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या जात आहेत.