गडहिंग्लज पंचायत समितीचे यश कौतुकास्पद- हनीफ मुश्रिफ

23

🔹पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानातील प्रथम क्रमांकाबद्दल सत्कार

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

गडहिंग्लज(दि.३एप्रिल):-केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज सशक्तीकरण अभियानात गडहिग्लज पंचायत समितीने केलेले काम कौतुकास्पद आहे. पंचायत समितीच्या या उत्तुंग यशात पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकारी कर्मचारी, गावागावातील ग्रामपंचायती व ग्रामस्थांचे योगदान मोठे आहे.

गडहिंग्लज पंचायत समितीच्या या यशाबद्दल माझ्या हस्ते पंचायत समितीच्या सभापती सौ. रुपाली गौतम कांबळे, उपसभापती हीराप्पा शंकर हासुरे, गटविकास अधिकारी शरद मगर व सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्‍वर यांचा सत्कार शासकीय विश्रामगृहात झाला.

यावेळी सभापती सौ. कांबळे म्हणाल्या, गडहिग्लज पंचायत समितीने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध शासकीय , सामाजिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. पंचायत समितीपासून ग्रामपंचायती व गावागावातील जनतेपर्यंत सर्व योजनांचा पाठपुरावा करून हे अभियान शंभर टक्के यशस्वी केले. पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या संघटित कष्टाचे हे फलित आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, अमर चव्हाण व इतर प्रमुख उपस्थित होते.