शेगांव शहरातील स्टेट बॅकेच्या मुख्य शाखे समोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

29

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

शेगाव(दि.3एप्रिल):- अत्याआवश्‍यक सेवे मध्ये बॅॅकेचा समावेश असुन बॅकेकडुन ग्राहकाना सेवा देतानाही कुठेही गर्दी होऊ नये याचे नियोजनही बॅकेकडुन करण्यात आले नाही उलट मुख्य दरवाजा बंद करुन पेट्रोल पंपाच्या बाजुने गेट कडुन ग्राहकांना बॅकेत प्रवेश दिल्या जात आहे त्यामुळे गर्दी कमी न होता वाढत असुन या मुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
यावेळी येथे सामाजिक अंतर राखून कामकाज करण्याच्या सूचना बॅकेना नसाव्यात असे लिहल्यास वावगे ठरु नये . मात्र, शेगांव येथील मेनरोड वरील पेट्रोल पंपाजवळील बँकेत लॉकडाउन मधील नियमाचे पालन होत नसल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे.

शेगांव शहरातुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नगर परिषद मुख्यधिकारी श्री प्रंशात शेळके साहेब व शिक्षक कर्मचारी राञ दिवस सुरक्षितता व सामाजिक अंतर जपणेच महत्त्वाचे आहे.ही बाब नागरिकाना वेळोवेळी सांगत आहेत माञ स्टेट बॅक शेगांव शाखेकडुन या बाबत काहीच खबरदारी घेतली जात नाही. मास्क, सामाजिक अंतर राखण्याच्याही सक्त सूचना नगर परिषद व जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सर्वाना दिल्या आहेत. मात्र, येथील स्टेट ब बँकेसमोर त्यांच्या या आदेशाला खो-दिल्याचे पहायला मिळत आहे. दैनंदिन व्यवहारासाठी बँकेसमोर नागरिकांची चांगलीच झुंबड उडताना दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडला आहे.