विद्रोही कविता या कवितासंग्रहाचे उद्या ऑनलाईन प्रकाशन

33

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.3एप्रिल):-प्रसिद्ध कवी व समीक्षक मा. वसंत भागवत संपादित व लिखित विद्रोही कविता आणि खदखद या दोन कवितासंग्रहांचा ऑनलाईन प्रकाशन समारंभ रविवार दि. 4 एप्रिल, 2021 रोजी दुपारी 12:30 वा. निर्मिती प्रकाशनच्या आदित्य सभागृह, सी वॉर्ड, सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर येथे प्रसिद्ध कवी आणि लेखक राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सातारचे सुप्रसिद्ध कवी उध्दव पाटील हे उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कवी व समीक्षक डॉ. अमर कांबळे हे उपस्थित राहणार आहेत.

या प्रकाशन समारंभाचे निवेदन शांतीलाल कांबळे हे करणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हमाने व संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका प्रा. शोभा चाळके यांनी केले आहे.सदर प्रकाशन समारंभ निर्मिती प्रकाशन या फेसबुक पेजवर ऑनलाईन पाहता येईल.