✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.3एप्रिल):- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर आज येवला दौऱ्यावर असतांना विंचूर व लासलगाव येथील डेडिकेटेड कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी रुग्णांना योग्य प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात की नाही याची खातरजमा करत रुग्णांची चौकशी केली,

यावेळी तहसिलदार शरद घोरपडे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, सरपंच सचिन दरेकर, भाऊसाहेब भवर, पांडुरंग राऊत, आनंद मवाळ, डॉ.चंद्रकांत ठाकरे, डॉ.शैलेश काळे , डॉ. किशोर चौधरी, डॉ.सचिन जेऊघाले, ग्रामसेवक जी.टी. खैरनार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या या लढाईत खाजगी डॉक्टर्स, नर्स व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे.आज येवला दौऱ्यावर असतांना प्रथमतः विंचूर येथे उभारण्यात आलेल्या खाजगी कोविड केअर सेंटरची पाहणी करत डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.त्यानंतर लासलगाव ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात सद्या ३० बेडस कार्यान्वित असून अधिक १० ऑक्सिजन बेडस वाढविण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.मनुष्य वाचविण्याची ही संकटाची लढाई असून खाजगी डॉक्टर, नर्स व स्वयंसेवी संस्थानी यांनीही या लढ्यात उतरावे.

“लासलगाव उड्डाणपूल व बायपास रस्त्याच्या कामाची पाहणी”

आज लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल व बायपास रस्त्याची पाहणी केली. सदर रस्त्याचे व उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भूसंपदानाबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून घ्याव्यात असे आदेश यावेळी दिले.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED