येसगी पुलाचे श्रेय लाटणे बंद करा

28

🔹तत्कालीन सेना आमदार सुभाष साबणे यांचे प्रयत्न- भाजपने ही घेतले श्रेय

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो.नं.9422481332

बिलोली(दि.3एप्रिल):- तालुक्यातील महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणारा येसगी येथील मांजरा नदीवरल पूर्ण जिर्ण झाल्याने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी तब्बल 188 करोड 69 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर या कामाचे श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. बिलोली-देगलूरचे तत्कालीन आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निधी आल्याचे म्हटले आहे. या पुलाची लांबी 800 मीटर असून गेल्या 35 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व आंध्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एन.टी. रामाराव या भागाचे तत्कालीन आमदार बळवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात या पुलाचे बांधकाम झाले होते. त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षापासून हा पूल कमकुवत होत असल्याचे संबंधित यंत्रणेकडून तपासणे अहवालामार्फत करण्यात आले. अशा वेळी तत्कालीन आमदार सुभाष साबणे यांच्या लक्षात ही बाब निदर्शनास आल्यानंतर सन 2017 मध्ये बजेटमधून या पुलाचे बेरिंग बदलणे व दुरुस्तीचे काम केले होते. सध्या सदर पुलावरून जड वाहतूक बंद आहे.

आमदार या नात्याने साबने यांनी पुलाच्या निर्मितीसाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करून नामदार नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांचे प्रयत्न आज फळाला आले.तसेच नामदार नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनीही आपल्या पातळीवरून या कामास विशेष मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. माजी आमदार सुभाष साबणे आणि या पुलाच्या मंजुरी बाबत आनंद व्यक्त करुन आमदार नितीन गडकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे म्हटले आहे. तर भाजपने येसगीतील नवीन पुल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या विकासाचा एक भाग असल्याचे म्हटले आहे.