भारतीय समाजाला गुलामगिरीच्या चक्रव्युहात ढकलणारी व्यवस्था म्हणजे खाजगीकरण होय.भारत देश जेव्हा पासून प्रजासत्ताक झाला तेव्हा पासून अलोकशाहीवृत्तीवादी भारताला स्वतःच्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.पण भारतीय संविधानातील बळकटीमुळे राजकर्त्यांना तसे करता आले नाही.१९८५ पासून भारतीय राजनीती नव्या मोडवर आली आहे.बदलत्या युगाचे नवे स्थितंतरे आपल्या पाहायला मिळत आहेत.देशहीतपेक्षा स्वःहीत व पक्षहीत यामध्ये राजकारणी मशगुल असल्याने गरीब हा गरीब तर श्रीमंत हा श्रीमंत होत आहे.भ्रष्टाचारांचे नवे कुरण म्हणजे आजचे राजकिय क्षेत्र पाहायला मिळत आहे.सरकारी सेवावर कुटाराघात करून खाजगी मालकांचे नवे अर्थसम्राट निर्माण झाले आहेत.शिक्षणक्षेत्र,दुरसंचार क्षेत्र,बँक क्षेत्र , कमजोर झाले असून खाजगीकरणाचा उदो उदो सारीकडे वाढला आहे.आजचे वर्तमान केंद्र सरकार भांडवलधार्जिने असल्याने देशातील सर्व सरकारी क्षेत्र विकण्याचा सपाटा सरकारने लावला आहे.

भारतीय दुरसंचार व्यवस्थेला मोळकळीस आणून विदेशी कंपण्यांनी भरघोस फायदा केला आहे.कोरोना महामारीने मोबाईल कंपण्यांची चांदी झाली आहे. ऑनलाईन शिक्षणाने व वर्क टू होम प्रक्रियेने साऱ्या डाटा कंपन्यांनी अतोनात पैसा कमविला आहे.भारतीय उच्चतम श्रीमंताच्या फायद्यासाठी सामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे.ऑनलाईन परिक्षेसाठी दहावी व बारावी मधील श्रीमंत विद्यार्थांनी आंदोलन चालवले आहे.खेड्यातील लाखो विद्यार्थी अॉनलाईन शिक्षणापासून कोसो दूर असतांना श्रीमंत विद्यार्थी स्वतःचा विचार करत आहे हे नक्कीच वेदनादायक आहे.यासाठी शासनाने योग्य पावले उचलने गरजेचे आहे.विद्यार्थांत गरीब व श्रीमंत असा भेद निर्माण होऊ देऊ नये . नाहीतर यांचे गंभीर परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील.आज फुकटच्या डाटाने तरूण पिढी वाईट मार्गाने जात आहे.तरी सरकार यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.कारण हाच तरूण राजकारणी लोकांचा खरा राजवाहक आहे.

१९९१ पासून भारतात खाजगीकरणाचे वारे जोरात वाहू लागले.राव-मनमोहन मॉडेलने खाऊजा नीतीचा स्वीकार करून भारतीय सरकारी क्षेत्राला पंगू केले.कृषी , शिक्षण,कामगार व असंघटित क्षेत्राला या नीतीने जबरदस्त हादरे दिले.पैसाच्या झगमगाटात सरकारी कंपण्या कवडीभावाने विकल्या गेल्या . आर्थिक विकासाचे मॉडेल श्रीमंतासाठी लाभदायक ठरले पण गरीब व बेरोजगारासाठी धोकादायक ठरले.या खाजगीकरणाने आदिवासी,शेतकरी,कामगार, कर्मचारी यांचे शोषण केले.राजकारण्यांनी खाजगीकरण म्हणजे भारताचे नंदनवन करणारा महामार्ग असा भ्रम निर्माण करून खाजगीकरण म्हणजे भारताला गुलाम करण्याऱ्या षडयंत्राचे वास्तव लपवून ठेवले.

१९९१ ते २०२१ या कालखंडात देशातील व विदेशी कंपण्यांनी अब्जो रूपयांचे द्रव्यनिःसारण केले आहे.करोडो कामगाराचे शोषण करून गडगंज संपत्ती कमावली आहे.या कमाईवर सरकारला टेकू देऊन देश गुलाम केला आहे.आज लोकशाहीचे लक्तरे वेशीवर टांगवले जात आहे.नव्या कायद्याने भारतीय कामगार व शेतकरी वर्गाला दास्य व गरीबीच्या अंधकारमय आभासी जगात लोटले आहे.नवा भ्रम मेंदूत तयार करून खरे वास्तव लपवून ठेवले आहे.सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी नवी रणनीती आखत आहे.तरी शेतकरी स्वतःची जमीन व देश वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत.न्यायालयातील न्यायधिशांनी आरक्षण समाप्त करण्याविषयी सुतोवातन केले आहे.कायद्यानी सत्यता सांगणाऱ्या न्यायधिशांनी असे वक्तव्य करून स्वतःचे पूर्वग्रहदूषितपणाची भावना जाहीर केली आहे.त्याच्या बोलण्यांनी आरक्षणाविषयी भ्रम निर्माण झाला आहे .तर आरक्षणाचे खरे वास्तव जनतेपासून डोळेझाक होत आहे.आरक्षण समाप्त करता येत नसल्याने सर्व सरकारी विभागाचे खाजगीकरण करून व प्रतिआंदोलन करून आरक्षण कमकूवत करणे हे त्यांचे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे.

आज कोविड-१९ च्या महामारीने सारे क्षेत्र प्रभावित झाले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ऋुण अवस्थेत पोहचली आहे.अनेकांची आयुष्य उध्दवस्त झाली आहेत.अशा कठीण काळात केंद्र सरकारने सरकारी सेवा क्षेत्राचे खाजगीकरण करण्याचा कपटी डाव आखला आहे.खाजगीकरणातून देशहीत असल़्याचा भास निर्माण करून स्वतःच्या मित्रांचा फायदा करण्याचा हा डाव दिसून येत आहे.वित्तमंत्री यांनी अर्थसंकल्पात खाजगीकरणाचा आगाज केला आहे.बँक व विमा क्षेत्र, अनेक सरकारी क्षेत्रात खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बँक कर्मचारी स्वतःला सरकारचे तारणहार समजत होते.त्याच कर्मचाऱ्यांचे जीवन उध्दवस्त होत आहे.ग्रामीण जनतेचे जीवन श्रीमंताच्या हवाली करून देशाला विकण्याचा हा डाव फारच धोकादायक ठरू शकतो.भारतीय सर्व नागरिकांनी खाजगीकरणातील भ्रम व वास्तव यांचा योग्य अर्थ समजून स्वतःची वाटचाल करावी.येणाऱ्या पुढील निवडणूकित यांचे गंभीर परिणाम पाहायला मिळतील .देशातील तरूणांनी व सर्व लोकांनी सरकारचे धोरण समजून घ्यावे.देशाला विकणाऱ्या कावेबाजापासून देशाचे रक्षण करावे.सारे भेदभाव सोडून आपण एक होऊ या .देशाला आम्ही विकणार नाही असा भ्रम निर्माण करणाऱ्या सत्तेपासून सावध राहावे.खाजगीकरणातील वास्तव ओळखून नवा क्रांतीपथ निर्माण करून देशाला व संविधानाला वाचवावे हाच खरा मार्ग आहे.दुसरा कोणताच मार्ग चांगला नाही.तुर्तांस थांबतो ..!

✒️लेखक:-प्रा.संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००

नागपूर, महाराष्ट्र, लेख, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED