नॅशवल सोशालिस्ट पार्टी चा जनतेने स्विकार करावा – बाळासाहेब आपटे

53

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.4एप्रिल):-बाळासाहेब आपटे यांनी जनतेच्या वेदनांबद्दल हळहळ व्यक्त केली. मुख्यमंत्री रोज संवाद साधतात. उपाययोजनांबद्दल बोलतात. पण तथाकथीत महामारी मुळे मृत्यूमुखी पडलेल्या पेशंट च्या पोस्ट मार्टम करण्याबाबत काहीच बोलत नाहीत. मोफत रुग्ण सेवेबद्दल काहीच बोलत नाहीत. दवाखाने लुटमार करत आहेत. नातेवाईक आणि पेशंट कंगाल होत आहेत. एकीकडे रोजगार बंद आहेत. लाईट बिलात सवलत नाही. कर्ज हप्त्यांच्या व्याजदरात सवलत नाही. घरपट्टी वसुली चालु आहे 24 ℅ इतका भयंकर व्याजदर वसुल केला जात आहे. पाणी पट्टीत सवलत नाही. शाळा बंद आहेत.

आणि शिक्षक फुकटचा पगार गिळत आहेत. राज्य सरकार ने पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर त्यात आणखी एक रुपया अतिरीक्त वाढ केली. चित्रपट गृह नाट्यगृह बंद केली त्यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञांवर उपासमारीची वेळ आली. रस्ते खराब, नद्यांमधे जलपर्णी वाढली नद्या प्रदुषीत आहेत. राज्यावर 5 लाख कोटीचं कर्ज वाढलं,महाराष्ट्र म्हणजे समस्यांचा पेटारा झाला आहे. *रुग्ण घरी जाऊन शोधता आणि आकडेवारी वाढवता का कशासाठी हा अट्टाहास !

डायबेटीस ची आकडेवारी काढा कॅन्सर, ब्लड प्रेशर, मलेरीया,डेंग्यू,हिवताप,कीडणी स्टोन, किडणी फेल, लिव्हर फेल, टीबी, हार्ट डिसिज, मग कळेल रोगाच प्रमाणं, महामारी च्या नावाखाली पेशंटला लपवून त्यांच्यावर कसले प्रयोग करता,
मास्क घालायला लावून मुस्कटदाबी करता रस्त्यावर कुठे व्हायरस फीरतो दाखवता का ? कोणते कीडे नाकात घूसतात, रस्त्यावरची हवा घरात, मंत्रालयात घूसत नाही का ? नफेखोर कंपन्या डाॅक्टर लाॅबीशी हातमिळवणी करुन रोज नवे व्हायरस आणत आहेत किती दिवस लोकांचं आयुष्य बर्बाद करणार
लस घेतल्यावर पण तुमचा हा रोग होईल म्हणता. मग लस द्यायची नाटकं कशाला करता. मास्क लावला तरी रोग होतोय तर मास्क ची नाटकं कशासाठी सुरक्षा व्यवस्थेची दहशत घालुन राज्य राबवत आहात.

जनतेने आता हे ओळखण्याची आवश्यक्ता आहे. मेडीसीन कंपन्या नक्की कोणत्या नेत्याच्या मालकीच्या आहेत, कोणाचे खिसे भरले जात आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. पण जनतेवर दहशत आहे आणि नेत्यांची मिलीभगत आहे. नॅशनल सोशालिस्ट पार्टी या सगळ्याचा छडा लावेलं , लोकांनी लोकांसाठी चालवलेली ही पार्टी कंपन्या,नेते, दवाखाने आणि डाॅक्टर सगळ्यांची संपत्ती जप्त करुन तुम्हाला नुकसान भरपाई देईल.

पेशंट आणि नातेवाईकांना त्यांचा केलेला खर्च रिफंड मिळेल. जे मृत्यूमुखी पडले ते कोल्ड ब्लडेड मर्डर सिद्ध करुन डाॅक्टरांना फासावर लटकवलं जाईल. चारही मुख्य पक्षांना तुम्ही अनुभवलं आहे. एकदा नॅशनल सोशालिस्ट पार्टीला साथ द्या.
www.nspunited.in वर जाऊन मेंबर व्हा. पदाथिका-यांना संपर्क साधून जबाबदा-या ध्या. तुमची मदद फक्त तुम्हीच करु शकता गरज आहे फक्त एका निर्णयाची असा विश्वास बाळासाहेब आपटे यांनी तमाम मराठी बांधवांना दिला आहे.