रयत शेतकरी संघटनेचे नेते प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांचा ३५ वा वाढदिवस कोरोना प्रभावामुळे साजरा करण्यात येणार नाही

27

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)

गेवराई(दि.4एप्रिल): – आपण वाढदिवस साजरा करणार नाही सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन, कोरोना दररोजच्या वाटचालीत अनेक लोक दवाखान्यात तसेच पावलो पावली आयुष्यातून निघून गेली तसेच प्रशासनाच्या हलगर्जपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय हे अतिशय दुर्दैवी आहे कोविड सेंटर , दवाखाना आदी अडचणींवर कायम आपल्या परीने आपण प्रयत्न केला विविध ठिकाणी जाऊन गावं ते सर्वच स्तरातून राज्यात आपापल्या पातळीवर होईल तेवढ्या प्रमाणात रुग्णांना वैद्यकीय सेवा देणे, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, अनाथ,निराधारांना राशन, किराणा किट कपडे आदी होईल अशी मदत करावी.

कुठलीही जाहिरात प्रसिद्ध न करता आजपर्यंत दुःखद वा सुखद अनेक अनुभवांची शिदोरी व आशिर्वाद कायम सर्वोतोपरी आपल्या सोबत असल्यामुळे पुढील काळात राज्यातील सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपण कायम आपल्या परीने प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त करतो कुठे काही अडचण असल्यास रयत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मला कळवा, संपर्क साधावा असे आपल्या परिवाराने घोषित केले आहे गावं गाड्यातून आज महाराष्ट्रातील तमाम जनतेचे कामे विविध विभागातील अनेक प्रश्न कोणताही असो पर्याय म्हणून रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य मित्र परीवार व सुनील नानासाहेब ठोसर पाटील कायम आपल्या ऋणात राहील हाच शब्द व वचन मी आपणास देतो.

आणि करोना माहामारी मुळे वाढदिवस साजरा केला जाणार नाही. यांची सर्व मित्र परिवार व रयत शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी. आणि भेटण्यास कुणीही आग्रह धरु नये. आपण शुभेच्छा सोशल मीडिया च्या माध्यमातून किंवा फोन वर शुभेच्छा द्यावे. आपल्या शुभेच्छा माझ्या पर्यंत पोहचेल कारण कोरोना प्रभावामुळे आपल्या स्वतःची आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा रयत शेतकरी संघटनेचे नेते प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी व्यक्त केली आहे.