बळसाणे गावात १५ व्या वित्त आयोगातुन विकास कामांचा शुभारंभ

27

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

बळसाणे(धुळे)(दि.4एप्रिल):- साक्री तालुक्यातील बळसाणे गाव जैन धर्मीयांचे श्रध्दांस्थान म्हणून पुर्ण राज्यभर प्रसिद्ध आहे. परंतु गावातील एका वार्डात सांडपाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासुन गंभीर बनत चालली होती. या सर्व गोष्टीचा विचार करुन गावात १५ व्या वित्त आयोगातून अमरधाम येथे पेवर ब्लॉक व वार्ड क्रमांक तीन मध्ये बंदिस्त गटारी च्या कामाचे शुभारंभ लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

गावात वार्ड क्रमांक तीन मध्ये सांडपाण्याचा प्रश्न हा भरपूर वर्षापासून सुटत नव्हता. भारतभरातून जैन भाविक येथे दर्शनाला येत असतात. आणि याच रस्त्यावर पाणी मुळे घाणीचे साम्राज्य व रस्ता पूर्ण पणे चिखलाने डबघळत होता. यामुळे वाहन चालकांना गाङी चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत होती. रस्त्यावर खराब पाण्यामुळे डासांनी आपले साम्राज्य तेथे उभे केले होते. या सर्व प्रकाराचा येणाऱ्या भाविकांना व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता.

म्हणून वार्ड क्रमांक तीन मधील ग्रामस्थानी उपसरपंच महावीर जैन यांच्याकडे कैफियत मांडली. मागील महिन्याच्या मासिक सभेमध्ये विषय मांडून त्याला सरपंच यांनी संमती देऊन लगेच काम करायला सुरुवात केली. व अमरधाम येथे अनेक वर्षापासून घाणीचे साम्राज्य झाले होते. त्या जागी काहीतरी सुधारणा करावी.

लागेल असा मानस सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी केला. आणि लगेच पेवर ब्लॉक अमरधाम येथे बसविण्याचे काम सुरू केले. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायती प्रयत्नशील राहील अशी ग्वाही सरपंच दरबारसिंग गिरासे यांनी दिली. यावेळी सरपंच दरबारसिंग गिरासे, उपसरपंच महावीर जैन, ग्रामपंचायत सदस्य देविदास धनुरे, इंद्रसिंग गिरासे, सौ.ध्यानाबाई माळचे, सौ. कल्पनाबाई गिरासे, सौ. मिराबाई खंडेकर, सौ.जनाबाई मासुळे, प्रा.भूषण हलोरे उपस्थित होते.