गणेशपुर येथे संत सेवालाल महाराज सामाजिक भवन व सिमेंट रोङचे भुमीपुजन

24

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.4एप्रिल):- तालुक्यातील पार्ङी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गणेशपूरव सेवादास नगर येथे तांडा सुधार वस्ती योजना.सन 20/21 अंतर्गत 10 लाख रुपयाचे संत सेवालाल महाराज सामाजिक भवन व सेवादास नगर येथे 10 लाख रुपयाचे संत सेवालाल महाराज सामाजिक भवन व गणेशपुर येथे 5 लाख रुपयाचे सिमेंट रोडचे भूमिपूजन तसेच 25 /15 योजेनअंतर्गत पार्ङी येथील वार्ङ क्र .3 मधील 10 लाख रुपयाचे सिंमेंट रोङचे लोकार्पण सोहळा पुसद विधानसभेचे आमदार श्री इंद्रनीलभाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी गणेशपुर येथील नागरिका सोबत विविध विषयावर आ.इंद्रनिलभाऊ नाईक यांनी चर्चा केली यामध्ये वारंवार खंडित वीज पुरवठा होत असल्यामुळे भुईमुंगाचे पीके सुकत आहे तसेच भाजीपाला पीकाचे नुकसान होत आहे .हा विज पुरवठा सुरळीत सुरु करण्याची मागणी केली,

तसेच पार्ङी सेवादास नगर गणेशपुर येथील पांदण रस्ते पाणीपुरवठा सिमेट रोड सांडपाण्याच्या नाल्या घरकुल आदी विविध मागण्या पार्ङी गणेशपुर सेवादास नगर येथील नागरिकांनी केली आहे .

यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर राजू पुरी निंबी ग्रामपंचायतीचे सरपंच मयुर राठोड .करण ढेकळे. देविदास झरकर, ज्ञानेश्वर वाठ.अशोक गोरे. सुनील राठोड. मोहन पवार. बबन अलङवार . गणेश राठोङ.पार्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.संगीता राठोड. ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे. राजू मोरे .बाबाराव अंभोरे.नवनाथ पवार सचिव ए.बी.जाधव. रामदास केवटे नंदू कांबळे.सलीमभाई राजकुमार झरकर संदीप भोणे संजय कानङे बाळू पाटील प्रकाश गोरे.संजय मते विष्णू केवटे.संतोष अनखुळे.शिवराम शेटे..विनोद वाघमारे.विनोद कानङे. गणेश राठोङ भिमराव पवार. समाधान शिनगारे बाबुराव पवार.मोरेश्वर राठोङ,सुभाष पवार,सुभाष राठोङ,रामराव राठोङ, प्रेमसिंग पवार,सुभाष आडे, ज्ञानेश्वर राठोङ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दारासिंग चव्हाण यांनी केले.
आभार प्रदर्शन अरुण बरडे यांनी मानले ,कार्यक्रमाला पार्ङी गणेशपुर सेवादास नगर येथील नागरिक हजर होते.