चंद्रपूर जिल्ह्यात (दि.4एप्रिल) रोजी 24 तासात 186 कोरोनामुक्त 364 कोरोना पॉझिटिव्ह – तीन कोरोना बधितांचा मृत्यू

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.4एप्रिल):- जिल्ह्यात मागील 24 तासात 186 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 364 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 29 हजार 106 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 946 झाली आहे. सध्या 2725 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 82 हजार 150 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 49 हजार 332 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये नागभिड येथील 74 वर्षीय पुरूष, चिमुर येथील 57 वर्षीय पुरूष व घुग्घुस येथील 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 435 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 395, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 364 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 124, चंद्रपूर तालुका 44, बल्लारपूर 14, भद्रावती 18, ब्रम्हपुरी 24, नागभिड 14, सिंदेवाही तीन, मूल 12, सावली 11, गोंडपिपरी तीन, राजूरा सहा, चिमूर 31, वरोरा 20, कोरपना 18, जीवती 11 व इतर ठिकाणच्या 11 रुग्णांचा समावेश आहे.नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात दोन मृत्यूसह आज(4 एप्रिल) 111 नवीन कोरोना बाधित तर 68 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.04: आज जिल्हयात 111 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 68 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10977 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10268 वर पोहचली. तसेच सद्या 576 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 115 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज दोन नवीन मृत्यूमध्ये आलापल्ली येथील 60 वर्षीय महिलेचा तर दुसऱ्या मृत व्यक्ति मध्ये गडचिरोली येथील 77 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.71 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5. 25 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला.

नवीन 111 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 46, अहेरी 10, आरमोरी 2, भामरागड तालुक्यातील 20, चामोर्शी 8, धानोरा तालुक्यातील 1, कोरची 2, कुरखेडा 03, मुलचेरा 1, सिरोंचा 3, तर वडसा तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 68 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 42, अहेरी 8, आरमोरी 4, भामरागड 1, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 1, सिरोंचा 1, कुरखेडा 3, तर वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये नवेगाव 10, शिवाजीनगर 1, कारगिर चौक 1, ओमनगर 1, लांजेडा 6, त्रिमुर्ती चौक 1, कॉम्पलेक्स 2, रामनगर 2, झेडपी क्वॉर्टर 1, जेप्रा 1, चामोर्शी रोड 2, वसा 2, गोकुलनगर 2, गोगांव 1, आंबेशिवनी 1, शाहुनगर 1, मेडिकल कॉलनी 2, आशिर्वादनगर 1, सिआरपीएफ कॅम्प 1, होंडा शोरुमजवळ 1, लक्ष्मीनगर 1, हनुमान वार्ड 1, स्थानिक 1, राजगट्टा 1, बोदली 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली 4, आलापल्ली 3, स्थानिक 2, महागांव 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये भवानीपूर 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 4, घारगांव 1, रेगडी 3, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, पोलीस कॅम्प कोटगुल 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 13, एलबीपी हेमलकसा 6, झारेगुडा 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये सुधागुडम 1, नेमाडा 2, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये एम जी विद्यालय 1, स्थानिक 4, गांधी वार्ड 1, सिंधी कॉलनी 1, कुरुड 3, आमगांव 4, विसोरा 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे.