✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

धुळे(दि.4एप्रिल):- Covid-19 च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज दिनांक 4 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

तसेच या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन रक्तदान करून गरजू रुग्णांच्या होणाऱ्या हाल-अपेष्टा वाचवण्यास सहकार्य करावे. असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्हाध्यक्ष ॲड.दुष्यंतराजे देशमुख यांनी यापूर्वीच केले होते.

मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार मनसे धुळे शहर विभाग अध्यक्ष हरीश जगताप यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मनसे राज्य उपाध्यक्ष श्री.रावसाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मनसे धुळे जिल्हा सरचिटणीस अजितसिंह राजपूत, संदीप जडे, संतोष मिस्त्री, राजेश दुसाने, दिपक पाटील, निलेश गुरव, अविनाश देवरे, वाल्मिक जाधव, साहिल खान, बापू ठाकूर, हेमंत हरणे, अक्षय शिंदे, रोहित नेरकर, अमृत पाटील, प्रज्वल चव्हाण, उज्वल देवरे, राहुल बाविस्कर, हर्षल बाविस्कर, राकेश ससाने, वैभव पाटील, मयूर ठाकरे, शुभम वाघ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. व यांनी देखील या शिबिरात रक्तदान केले.

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि निर्णय जनसेवा ब्लॅड बँक*

यांच्या संयुक्त विद्यमाने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन मनसे धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे करण्यात आले होते. निर्णय जनसेवा ब्लॅड बँकेच्या वतीने मनोज माळी व उज्वल वाघ यांचे विशेष सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरामध्ये अनेकांनी रक्तदान करून रक्तदान हेच श्रेष्ठदान हे पुन्हा एकदा सिद्ध केले. रक्तदान करणार्‍या दात्यांच महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED