वर्षा तांदुळकरने गरीबी मात करून बनली पोलिस उप निरीक्षक

28

🔸मेहनत व चिकाटीने परीवारच नाव केल उज्ज्वल

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.5एप्रिल):- मानसात मेहनत व जिद्द चिकाटी आणि कामात इमानदारी असली तर तो कोणत्या परीस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठू शकतो असे बोलले जाते असंच काहीसं उदाहरण हिंगणघाट शहरातील टिळक वार्ड येथे वर्षा तांदुळकरने पोलिस उपनिरीक्षक बनुण समाजा समोर एक आदर्श निर्माण केला.

वर्षा तांदुळकर हिच्या घरीची परीस्थिती अंत्यत हालाखीची आहे तिचे वडिल लहान पणी मरण पावले तीच्या आईने रोजमजुरी करुन वर्षा व तिच्या दोन भावाचे पालन पोषण केले.मात्र मुल मोठे झाल्याने त्याच शिक्षण आटोक्याच्या बाहेर असल्याने वर्षाच्या एका भावाला चे शिक्षण तिच्या मावशीकडे यवतमाळ येथे मावशीने त्याचा शिक्षणाचा खर्च उचल तो आज इंजिनिअर बनला आहे. वर्षा तांदुळक हिने आई सोबत राहात शहरातील बिडकर कॉलेज मध्ये आपले कसे बसे शिक्षण घेतले.

मात्र तिची लहान पणापासून पोलिस खात्यात नौकरी करण्याची इच्छा होती.हि इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या जवळ एमपीएससी परीक्षेसाठी शिकवणी लावण व शहराबाहेर जाण्यासाठी पैशाची सोय नसल्याने तिने शहरातील विवेकानंद अभ्यासिका मध्ये एमपीएससी परीक्षेची पुर्व तयारी केली. व एमपीएससी परीक्षेत नुसती पास झाली नाही तर वर्षाने महाराष्ट्र एमपीएससी परीक्षेत साहावा क्रमांक पटकावून बहुमान मिळविला होता .

वर्षा तांदूळकर हिचे पोलिस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण नुकतेच पुर्ण झाले असून ती आता पोलिस उपनिरीक्षक पदावरून रुजू होणार आहे.सध्या नागपूर विभागात पोस्टींग मिळाली असून येत्या काही दिवसांत वर्षा कोणत्या तरी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू होणार आहे. वर्षा तांदुळक हिने दाखविले मेहनत व चिकाटी व चिद्दीच्या भरोशावर मिळविलेल्या यशाचं शहरात सर्व कौतुक करण्यात येत आहे.