‘मैदानं’ जाहीर करणे, गाजविणे आणि जिंकणे हे तर वंचित बहुजन आघाडीचे कामं, नावे ठेवणा-या विकृतांनी आत्मपरिक्षण करावे ! – अमोल पांढरे

27

जंगी कुस्त्यांचे मैदानं जाहीर करावे… अगदी तसेच, महाराष्ट्रातील कोणत्याही मैदानाचे नाव जाहीर करावे, मुंबईतील शिवाजी पार्कसुद्दा…! तारिख, वेळ आणि मैदानाचे नुसते नावं सांगायचे… ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेला ते मैदान भरेल की नाही ? याची चिंता करायची नाही. कारण, ते मैदानं सामना सुरु होण्यापुर्वीच ओसांडून वाहणार याची प्रत्येकाला खात्री असणार.

मैदानावर पाय ठेवायला जागा नसेल तर शेजारच्या इमारतीवर बसून मैदानाचा आनंद घ्यायचा… जागा नाही मिळाला तर नाराज व्हायचे नाही, समोरचे कांही दिसले नाही म्हणून हिरमसून जायचे नाही, तर जिथे असेल तिथे आपल्या विचारांशी जोडले जायचे, असेल तिथून विचारांचे सोने लुटायचे…

पण वंचितांचा आवाज बुलंद करायचा, आपल्या वाघडरकाळीने विरोधकांच्या कानठिळ्या बसल्या पाहिजेत. त्याच्या पायाखालची वाळू सरकली पाहिजे, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे, लोकसभेला भुईसपाट तर विधानसभेला ते आडवे झाले पाहिजेत आणि तिनं चाकाचं सरकार आणण्यासाठी प्रस्थापितांची त्रेधातिरपट उडाली पाहिजे…

याचा बंदोबस्त करायचा. राज्यातील सभेचे हादरे केंद्रात बसले पाहिजेत यासाठी, स्वाभिमानाने जगणा-या, लोखंडाचे चणे खावून लढणा-या, परिवर्तनाचे चक्र आसासहित फिरविणा-या, लढावू कार्यकर्त्यांच्या जत्थ्याचे नावं आहे, वंचित बहुजन आघाडी. त्यामुळे, स्वबळावर मैदानं जाहीर करायचे आणि ते जिंकायचे हे वंचित बहुजन आघाडीचे कामं आहे.

ते कामं ये-यागबळ्याचे नाही. परिणामी नावे ठेवणारे जे कोणी आहेत. त्यांच्याकडे ते स्वतः सोडले तर दुसरे कोणीच नाही. हे त्यांनी त्यांच्या कृतीने नुकतेच सिद्द केले आहे. त्यामुळे ज्यांच्या पाठीमागे साडेचार माणसं नाहीत. त्यांनी लायकीत राहून बोलावे. वंचित बहुजन आघाडीवर बोलून आपण विकृत आहोत, हे पुन्हा – पुन्हा सिद्द करु नये. एवढीच माफक अपेक्षा आहे.

✒️लेखक:-अमोल पांढरे (मो-93708 45390)

▪️संकलन:-नवनाथ पौळ
(केज तालुका प्रतिनिधी)
मो- 8080942185

( लेखक हे ग्रामपंचायत कुडणूर ता- जत जिल्हा- सांगली येथील माजी सरपंच तथा वंचित बहुजन आघाडी चे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आहेत.)