नवरा-नवरी लग्नास तयार, पण कोरोनाचा त्यांना नकार …

27

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.5एप्रिल):-गेल्या वर्षापासून सर्वत्र कोरोना आजाराचे संकट कायम आहे. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणा-यांना कोरोनाने पुन्हा रुक जाओ असा कडक इशारा दिला आहे. त्यामुळे नियोजित वधू वर चिंतेत दिसून येत आहेत. सहा महिन्यानंतर कोरोनाने पुन्हा जोर धरला आहे.

कोरोना दुसरा टप्पा हा भीतीदायक ठरत आहे. मात्र वर्षभरापासून लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या नव वधू-वरांच्या कुटुंबाने वारंवार मुहूर्त लांबणीवर टाकले होते. आता तरी सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे कोरोना नियमांचे कठोर पालन केले तर ठीक अन्यथा धोक्याची घंटा तयारच आहे.असा संदेश सर्वत्र जात आहे.मात्र नियोजित वधू वर व त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. लग्नाच्या बेडीत अडकू इच्छिणाऱ्या जोडप्यांना त्यांच्या नातेवाईकांना कोरोना रुक जाओ…!थोडा ठहर जाओ…असा कानमंत्र देत आहे.

यंदा नो शादी म्हणत मंगल कार्यालय, स्वयंपाकी,बँड, फुलारे, घोडेवाले अशा अनेकांची विवाह सोहळा वर असलेली रोजीरोटी आज कोरोनाने रोखली आहे.कुटून मिळणार रोजगार, इतर कामही बंद असल्याने पोटास तरी आराम देता येत नाही ना? बस एखादा दिवस म्हणून उपवास करता येतो पण नंतर कसे करणार गत वर्षभरापासून कोरोणामुळे सर्व धंद्याची वाट लागली आहे.