18 वर्षे वयोगटावरील प्रत्येक नागरिकास दहा हजारांची मदत द्या मगच लाॅकडाऊन करा

88

🔹छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.5एप्रिल):- सध्या कोरोना रोगाने राज्यात थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. दररोज मुख्यमंत्री लाॅकडाऊन संदर्भात बैठका घेत आहेत. राज्यात कधी लाॅकडाउन होईल काही सांगता येत नाही. मग अशा वेळी हातावर पोट असलेल्या नागरिकांनी काय खाव…? आणी कस जगाव…? हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना करत 18 वर्षे वयोगटावरील प्रत्येक नागरिकास दहा हजाराची मदत द्या मगच लाॅकडाऊन घोषित करा अशी मागणी छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी एका विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढला असुन दररोज रुग्णांची संख्या वाढत असुन मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.

यावर उपाय म्हणून लाॅकडाउन घोषित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या नेत्यांशी आणी व्यावसायिकांशी बैठका घेतल्या. आणी मिनी लाॅकडाउन म्हणून शनिवार आणी रविवार लाॅकडाउन घोषित केले परंतु मुख्यमंत्र्यांनी एखाद्या शेतकरी किंवा मोलमजुरी करणार्या मजुरदारांचा विचार केलाय का….? हा प्रश्न सुद्धा या निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे.

मागील वर्षी लाॅकडाउन झाले अनेकांचे संसार रस्त्यावर आले लहान मोठ्या व्यावसायिकांचे उद्योगधंदे बंद पडली युवकामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आणी आता दुसरी लाट सुरु झाली आणी परत लाॅकडाउन ची शंका नागरिकांच्या मनात येत आहे….

साहेब मागील वर्षी लाॅकडाउन झाले तेंव्हा कोरोना रोगाने कमी पण उपासमारीने जास्त मृत्यू झाले. म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी जनतेची योग्य ति काळजी घेत 18 वर्षे वयोगटावरील प्रत्येक नागरिकास दरमहा दहा हजारांची मदत जाहीर करुन नागरिकांच्या बॅंक खात्यात जमा करावी आणी मगच लाॅकडाउन घोषित करावे अशी मागणी राजेश मोरे यांनी केली