टिपू सुलतान फाॅऊंडेशनच्या वतीने पाणी व फराळ वाटप

27

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.5एप्रिल):-शेणगाव येथे दि. ४ एप्रिल रोजी बंजारा समाजाचे धर्मगुरू परमपूज्य डॉ.रामराव बापू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्या निमित्ताने बंजारा आणि इतर समाजाच्या वतीने गावात मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत टिपू सुलतान फाॅऊंडेशन व रजा जामा मस्जिद शेणगावचे सर्व पदाधिकारी सहभाग घेऊन पाणी व बिस्किटे वाटत करुन समाजा मध्ये एकतेचा संदेश दिला.

यामुळे बंजारा समाजाच्या वतीने पुतळा अनावरण च्या कार्यक्रमा मध्ये टिपू सुलतान फाॅउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनचा, प्रेमसिंग महाराज, आमदार सुभाष भाऊ धोटे, माजी आमदार संजय भाऊ धोटे व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पुतळा अनावरण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला