चंद्रपूर जिल्ह्यात (दि.5एप्रिल) रोजी 24 तासात 207 कोरोनामुक्त 265 कोरोना पॉझिटिव्ह – पाच कोरोना बधितांचा मृत्यू

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.5एप्रिल):- जिल्ह्यात मागील 24 तासात 207 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 265 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून पाच बाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 29 हजार 371 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 153 झाली आहे. सध्या 2778 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 82 हजार 692 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 50 हजार 116 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये सरदार पटेल वार्ड वरोरा येथील 35 वर्ष पुरुष, ब्रह्मपुरी येथील 34 वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील 77 वर्षीय व 66 वर्ष पुरुष तसेच बल्लारपूर येथील 82 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 440 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 400, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 265 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 92, चंद्रपूर तालुका 17, बल्लारपूर नऊ, भद्रावती तीन, ब्रम्हपुरी 10, सिंदेवाही तीन, मूल 10, सावली सात, राजूरा सात, चिमूर 35, वरोरा 52, कोरपना 15, जिवती एक व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात तीन मृत्यूसह आज(5एप्रिल) 73 नवीन कोरोना बाधित तर 36 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.05: आज जिल्हयात 73 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 36 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 11050 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10322 वर पोहचली. तसेच सद्या 610 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 118 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज तीन नवीन मृत्यूमध्ये दोन चंद्रपूर जिल्ह्यातील असून एक 60 वर्षीय व दुसरी व्यक्ति ही 67 वर्षीय असून दोन्ही महिलेचा समावेश आहे.

तर एक व्यक्ति ही तालुका अहेरी रा. आलापल्ली येथील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.41 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाणब5. 52 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.
नवीन 73 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 48, आरमोरी 1, चामोर्शी 2, धानोरा तालुक्यातील 1, कोरची 2, कुरखेडा 02, मुलचेरा 1, सिरोंचा 14, तर वडसा तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 36 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 16, अहेरी 5, आरमोरी 4, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 1, एटापल्ली 2, सिरोंचा 1, कुरखेडा 2, तर वडसा मधील 3 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये रामनगर 2, रेड्डी गोडाऊन चौक 1, स्थानिक 4, लांजेडा 1, साईनगर 2, वनश्री कॉलनी 4, अयोध्यानगर 5, मेडिकल कॉलनी 4, सुभाष वार्ड 2, मौशीखाम 1, सर्वोदय वार्ड 1, शेडमाके चौक 1, कन्नमवार वार्ड 4, नवेगाव 3, रेव्हेन्यु कॉलनी 1, रामराज भवन 1, कलेक्टर कॉलनी 1, सरकार नगर 2, सीआरपीएफ 1, स्नेहनगर 1, बजाज शोरुमच्या मागे 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये पुराडा 1, गुरनोली 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये विजय नगर 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये रेगडी 1, फॉरेस्ट कॉलनी 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये चातगांव 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, मसेली 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, मोयाबिनपेठा 2, नेमाडा 10, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कन्नमवार वार्ड 1, अकापुर 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 5 जणांचा समावेश आहे.