सारंग दाभेकर यांची दोन महिलांनी केली तडीपारीची मागणी

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.6एप्रिल):-सहायक पोलीस अधिक्षक चिमूर यांचे आदेशान्वये प्रस्ताव क्रमांक कलम 01/21 कलम 56(1ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय श्री. सारंग उर्फ पुरुषोत्तम भाऊराव दाभेकर यांना तडीपराची नोटीस कायम केली आहे.

विस्तृत वृत्त याप्रमाणे की. श्री. सारंग उ पुरुषोत्तम भाऊराव दाभेकर यांनी दोन महिलांना नाहक त्रास दिल्यामुळे दिनांक 05.04.2021 ला तडीपारीबदल नाटोस तामील करुन उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. सदर इसम पेसाचं व इतर कारणान महिलांना नेहमी नाहक त्रास देत असतो. त्यात शोषणाची मागणी करणे. धमकी देणे. अशिल भावेत शिविगाळ करणे, जास्तीचे पैसे मागने मारहाण करण्याचे प्रकार करणे. स्वतःच्या मोटारसायकलने बाजारात व गुजरीत महिलाचे पाठलाग करणे, टक लावून पाहणे, लज्जा निर्माण होईल असे वर्तन करणे. बदनामी करणे, स्वतःच्या मोबाईलवरुन व्हाटसअॅपवर नेहमी मॅसेज पाठविणे, घराकडे चकरा मारणे, मी वंचित बहजन आघाडीचा नेता आहे.

माझे कोणी वाकडे करीत नाही. पाहुन घेईन, अधिका-यांना खरेदी करेन असे असंविधानीक वक्तव्य करणे, माझी पोच मुंबईपर्यंत आहे, मी कोणाला भित नाही असेही वक्तव्य करणे, अधिकाऱ्यांच्या खोटया तक्रारी करणे. महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणे अशा अनेक प्रकारे दोन महिलांना मानसिक त्रास देणे सुरु असुन त्याच्या अत्याचाराला कंटाळून श्री. सारंग उ पुरुषोत्तम भाऊराव दाभेकर यांची बेल रद्द करावी तसेच त्याची तडीपारी कायम ठेवावी त्यासोबत सदर इसमापासुन दोन्ही महिलांना अत्यंत भिती वाटत असून जिवीतास धोका निर्माण झालेला आहे. अशा आशयाचे बयान सहाय्यक पोलीस अधिक्षक चिमुर यांचेकडे दिलेले आहे.

त्यासोबत दुस-या महिलेने माझे पती मरण पावल्यापासुन माझ्या किरायदारांना नाहक त्रास देणे, शिविगाळ करणे, माझ्यासोबत रहा, माझी बदनामी करणे, तुला संपवायला मला काही वेळ लागणार नाही, तु माझी होणार नाही तर कुणाचाही होणार नाही. रस्त्यावर अडविणे असे वक्तव्य करुन किरायदारांच्या घरावर गोटे मारणे, त्यांचेवर अश्लिल आरोप करणे असे अनेक कारणाने सदर इसमावर तडीपार कायम करावी असे दोन महिलांनी बयान दिलेले आहेत. सदर इसम दोन महिलांना वारंवार नाहक त्रास देत असल्याने श्री. सारंग उर्फ पुरुषोत्तम भाऊराव दाभेकर यांचेवर तडीपारी कायम करुन चिमुरमधुन हद्दपार करण्याची मागणी महिलांनी केली आहे. महिलांवर अशाप्रकारे अन्याय करणारा व्यक्ती चिमुरात पाहीजेत नाही अशी जनता मागणी करीत आहेत. सदर प्रकरणात महिलांना न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा महिला प्रशासनाकडून करीत आहेत.

महाराष्ट्र, मागणी, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED