लॉक डाऊन होईल काय?.मनाला सुन्न करणारी गोष्ट

36

२३ मार्च २०२० ला देशात लॉक डाऊन झाला तेव्हा कोरोनाच्या भीतीमुळे इटली,स्पेन अमेरिका सारखे सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सज्ज असलेले देश कोलमडून पडले होते. त्यांच्या देशात सरकारने दिलेल्या सूचना तंतोतंत पाळल्या जातात म्हणून ते कोरोनाशी चिवटपणे संघर्ष करून तग धरून होते.या उलट भारतात झाले होते,कायदा फाट्यावर मारणारे सुदैव्याने राज्य व केंद्रात सत्तेवर होते इतर देशांनी नोव्हेंबर,डिसेंबर २०२० ला दक्षता घेऊन उपाय योजना केल्या होत्या.महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणारा देश त्याबाबत कोणतीच तयारी करीत नव्हता.केंद्र सरकारने गांभियाने घेतले नाही म्हणूनच जनतेणे ही गांभीर्याने घेतले नाही. देशातील विरोधी पक्ष सुद्धा मानसिक दुष्ट्या अपंग झाला होता.

त्याचा आवाजात दम राहिला नव्हता.प्रत्येक राज्यातील शहरात लोक सैरावैरा जीव वाचविण्यासाठी शहर सोडून गांवाकडे पायी जात होते.त्यावर पोलिसांना लाठी चार्ज करावा लागत होता. तरी ही रोडवरील गर्दी कमी होतांना दिसत नव्हती हे इतर देशांच्या लोकांसाठी मनाला सुन्न करणारी गोष्ट होती.आज आता मुंबई सारख्या महानगरीत लॉक डाऊन होईल काय?.या भितीमुळेच लोक थंडी तापाने फणफणत आहेत.परदेशात असलेले भारतीय लोक तेव्हा आपल्या लोकांना सावधान करण्यासाठी दररोज वेगवेगळ्या भागातून व्हिडीओ क्लिप पाठवीत होते. तरी आपण भारतीय लोक त्या गांभीर्याने पाहत नव्हतो आणि विचार ही करत नव्हतो.

कोरोना च्या गंभीर संकटावर चर्चा होण्या ऐवजी पोलिसांनी दंडे का मारले त्यांना हा अधिकार कोणी दिला यावर जागोजागी चर्चा होतांना दिसत होती.ही मनाला सुन्न करणारी गोष्ट होती. आता एप्रिल २०२१ ला लॉक डाऊन होईल काय?.ही मनाला सुन्न करणारी गोष्ट होत आहे.एक डॉक्टर मरण्या पुर्वी आपल्या घरी बायको,मुलांना भेटण्यासाठी जातो, बायको मुलांना गेट वर थाबूंन बाहेरून पाहतो.थोडी विचार पूस करतो. अणि निघुन जातो. हॉस्पिटल मध्ये गेल्यावर निसर्गाच्या विज्ञानाच्या नियमानुसार या जगाचा निरोप घेऊन निघून जातो. किती दुःखाचा क्षण असेल तो की आपल्या बायकोची,मुलांची गळाभेट सुध्दा घेता आली नाही, ना प्रेम करता आले, ना पापी घेता आली आपल्या लेकरांची, ही मनाला सुन्न करणारी गोष्ट आहे कि नाही?. ही घटना अखंड मानवजात आपली कर्जदार असेल डाॅ हैदियो अली हे नांव नेहमी लक्षात ठेवा, हे मार्मिक चित्र त्यागाची प्रतिक आहे.

इंडोनेशियाचे डाॅ हैदियो अली यांची गोष्ट गेल्यावर्षी मनाला वेदनादायक होती, जे कोराना बाधीत रूग्णांचा इलाज करता करता स्वत सक्रंमित झाले. जेव्हा त्यांना वाटलं की ते आता वाचु शकत नाही तेव्हा ते आपल्या घरी गेले, बाहेरूनच आपल्या घराच्या गेटवर थाबुंन आपल्या गर्भवती पत्नी व दोन लहान चिमुकल्या मुलांना मन भरून पाहीले, आणि निघुन गेला,तेव्हा त्यांच्या पत्नीने फोटो होता, जेव्हा शेवटचा आपल्या गर्भवती पत्नी व दोन लहान चिमुकल्या मुलांना मन भरून पाहीले आले होते तेव्हा,ते लांबुनच पाहत थांबले होते, त्यांना नव्हत वाटतं की त्यांच्या मुळे त्यांच्या पत्नी व दोन लहान चिमुकले कोरानाच्या संपर्कात यावे म्हणून ,डाॅ हैदियो अली हे माणसाच्या रूपात खरा सुपरहिरो ठरला आहे, त्यांनी मानवजाती साठी दिलेले बलिदान व्यर्थ न जाण्यासाठी आपण त्यांनी दिलेला संदेश पाळावा.

गेल्या वर्षी 30 मार्च राष्ट्रीय डॉक्टर दिन होता. तेव्हा संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत होता. यात आघाडीवर होते अर्थातच डॉक्टर आणि त्यांचे सहकारी. तळहातावर शिर घेऊन हे योद्धे मैदानात उतरले होते. नोकरीचा भाग म्हणून काम करणं वेगळं आणि एक मिशन समजून त्यात स्वतःला झोकून देणं वेगळं,जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं अशी शेखी मिरविणारे कीडे-मकोडे-भिडे भारतात पायलीचे पंधरा आहेत.विज्ञानाची कास धरत कोरोना संकटाचा हे योद्धे निडरपणे आणि समर्पित भावनेने मुकाबला करत आहेत. कारण ते जाणतात अध्यात्माचा अंतिम थांबा विज्ञानच असून आपणास थांबता येणार नाही.संकट आल्याशिवाय माणसं देव आणि डॉक्टरांचा धावा करत नाहीत. ही मानवी प्रव्रुती होय. कदाचित म्हणूनच ‘गरज सरो,वैद्य मरो.’ ही म्हण रूढ झाली असावी. एकच वाटतं- कोरोनावर मात करायची असेल तर देवाचा धावा नव्हे; तर डॉक्टरात देव शोधा. त्यांचे मनोबल वाढवा.कोरोनाला हरविण्यासाठी डोक्याला कफन बांधून लढणा-या डॉक्टर,नर्स आणि सर्व सफाई कामगार कर्मचारी वर्ग यांचा अभिमान वाटला पाहिजे. त्यांचे मानावेत तेवढे आभार कमी आहेत.कोरोना संकाटला रोखले नाही तर मनाला सुन्न करणाऱ्या घटना घडतील त्यांची कल्पना करावी.

सरकारच्या सुचानाचे पालन नाही केले तर डॉक्टर आणि हॉस्पिटल बेड मिळणार नाही.भारत १३५ कोटी लोकसंख्येचा देश.८४ हजार लोकांमागे १आयसोलेशन बेड,३६ हजार लोकांमागे १ क्वारंटाईन बेड, देशात ॲलोपथी डाॅक्टर ११ लाख ५४ हजार सरकारी रुग्णालयातील बेड्स ७ लाख,गेल्या वर्षीचे हे आकडे आहेत. देशातील नागरिकांवर महामारीचे भयानक संकट असतांना ही आपण हॉस्पिटलला महत्व दिले नाही तर राम मंदिर साठी गावागावात मंदिर निर्माण निधी मोठ्या उत्सवात संकलन करण्यात आला. कोरोनाच्या पहिल्या आक्रमानातून आपण काहीच शिकलो नाही,म्हणून दुसरे आक्रमण आता सर्वानाच भारी पडणार आहे. लॉक डाऊन कोणाला परवडणारा नाही. गेल्या वर्षाच्या अनुभवातून आपण काहीच शिकलो नाही.या वर्षी आपण त्यात काय काय सुधारणा केली हे राज्य व केंद्र सरकार सांगूच शकत नाही. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला तर नियंत्रण करणे अवघड होईल आणि डाॅक्टर,हाॅस्पिटल दोन्ही मिळणार नाहीत. म्हणूनच सर्वांनी सरकारच्या सूचना पाळाव्यात.लॉक डाऊन होईल काय?.मनाला सुन्न करणारी गोष्ट आहे.

अशा परिस्थितीत ही सुरक्षित नोकरी करणारे सरकारी कर्मचारी गोरगरिबांची अडवणूक करून दंडाच्या नांवावर वसुली करत राहणार.भरमसाठ पगार,भत्ते असूनही ते समाधानी नाहीत.त्यांच्या अकुशल कर्माची शिक्षा याच जन्मी निवृत्तीनंतर त्यांचे मुलं व समाज त्यांना देत असतात.जन्मापासुन ते मृत्युपर्यत माणुस जगण्यासाठी प्रत्येकाशी शर्यतीत धावत असतो आणि तिथे जो थांबला तो संपला.पण आज आयुष्यात पहिल्यांदाचं अशी शर्यत होतेय,जो थांबेल तोच जिंकेल.अशी गेल्या वर्षी परिस्थिती होती.हजारो लाखो लोकांची नोकरी गेली होती.सर्वात मोठे संकट असंघटीत कामगारांच्या कुटुंबावर आले होते.लॉकडाऊनमुळे गेल्या २३ मार्च ते २३ सप्टेंबर २०२० मी घरात बसून अत्यावशक सेवा देत होतो.निवांतपणे झोप येत नव्हती.सतत असंघटीत कामगारांचे मोबाईलवर कॉल सुरु होते. त्या सर्व मनाला सुन्न करणाऱ्या गोष्टी आहेत.

असंघटित कामगारांच्या वतीने मायबाप सरकारला विनंती आहे,पोटावर मारू नका, पाठीवर मारा!.लॉक डाऊन करण्या आदी भुकेला टाळेबंदी करुन दाखवा,
मग आजन्म लॉकडाऊन करा. पुरे एक वर्ष झाले
सरकारने हा खेळ मांडला आहे कोरोनाची भिती दाखऊन माणूस घरात कोंडला आहे. तुम्हाला भीती वाटते लोक रस्त्यावर उतरून जाब विचारातील.त्या भीतीमुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या मनात असंतोष वाढत आहे. मनुवादी विरोधी पक्ष त्याला हवा देण्याचे कार्य अहोरात्र करीत आहे. त्यामुळेच एक ना एकदिवस जनभावनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.हे मात्र निश्चित आहे.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,
भांडूप मुंबई.अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना.