भाजपाची “वन बुथ थरटी युथ” ची बैठक येथे संपन्न

30

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

कोरपना(दि.6एप्रिल):- भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतिने नांदा येथे दिं 04-04-2021रोज रविवारी नांदा येथे पार पडली नांदा हे गाव मोठ्या लोकसंख्येचे असून या ठिकाणी मतदारांची संख्या सर्वाधिक असून या ठिकाणी बुथ कमिट्यांची संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीत वन बुथ थर्टी युथ ची बैठक घेण्यात आली यामध्ये बुथ प्रमुख ते तिस बुथ समितीचे पदाधिकारी नेमण्यात आले या बैठकीचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रामुख्याने श्री सतीश भाऊ उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदूर, श्री संजय भाऊ मुसळे माझी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष, श्री निलेश ताजने भाजपा नेते, श्री अरुण डोहे नगरसेवक गडचांदूर, श्री महादेव डुकरे भाजपा नेते, श्री विशाल पावडे उपस्थित होते या बैठकीमध्ये नांदा गावातील नागरिकांना बुथ कमिटींचे नेमकी गरज काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती निलेश भाऊ ताजणे यांनी बैठकीत उपस्थित असणाऱ्या नागरिकांना दिली.

या वेळेत गावातील इतर समस्या व तसेच गाव विकासाकरिता सामोरे जाण्याकरिता पायाभूत कमिटीने ची नितांत गरज आहेत तेव्हा पक्ष्यांच्या हितासाठी व गाव विकासांच्या उदात्त हेतूने या समित्या भाजपा पक्षाने गठीत करण्याचा मानस असल्याने या माध्यमातून भाजप पक्ष बळकट होतील व गावाचा विकासाला चालना मिळतील तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या एकमेकाच्या सहकार्यातून ही बुथ बांधणीत कार्यक्रम प्रत्येक गावात सुरू आहेत या कार्यक्रमाकरिता गावागावातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहेत असे मत यावेळी व्यक्त केलेत.

बूथ प्रमुख 30 सदस्य बुथ सदस्यांच्या समितीचा फार्म भरून श्री सतिष भाऊ उपलचवार यांना बैठकीत देण्यात आला श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बूथ प्रमुख हा चांगल्या प्रकारे काम करणारा प्रमुख व्यक्ती म्हणून निवडला जातो तसेच इतर समितीच्या सदस्यांची सुद्धा जबाबदारी तेवढीच असते बुथ हा निवडणुकीचा महत्त्वाचा भाग असतो प्रत्येकाने निवडणूक जिंकावी हाच उद्देश ठेवून बुथ वर आपलं काम करावं तसेच भाजप पक्षाची सत्ता येऊन सहा वर्षाच्या कालावधी झाला मात्र काँग्रेस पक्षाची सत्ता 68 वर्षे सत्ता भोगली परंतु मोठमोठे निर्णय सामान्य जनतेच्या हिताचे घेता आले नाहीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देता आले नाहीत मात्र भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या हातात हात देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सामान्य जनतेच्या समस्यांची सोडवणूक केली आहे शेतमालाला भाव दिला मात्र विरोधी पक्षांना आरोप-प्रत्यारोप करण्याव्यतिरिक्त काही दिसत नाहीत असे मत या वेळेत व्यक्त केलेत व बुथ प्रमुख,नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बैठकीला गावातील युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन संजय भाऊ मुसळे यांनी केले तर आभार विशाल पावडे यांनी मानले