नागणवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न निकालात काढा – ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.6एप्रिल):- नागनवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर निकालात काढा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात नागणवाडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीत श्री. हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या. बैठकीच्या सुरुवातीलाच नागनवाडी प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या वैयक्तिक समस्या मंत्री मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिल्या.यावेळी अधिकाऱ्यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांना दिलेल्या माहितीनुसार, नागणवाडी प्रकल्पग्रस्तांच्या पॅकेज पोटी २३ कोटी रुपये आले होते.

त्यापैकी १७ कोटी रुपये पॅकेजचे वाटप पूर्ण झाले आहे. जमीन संकलनानुसार ३८ कुटुंबे शिल्लक राहिलेत. १८ कुटुंबांचे पॅकेज वाटप या आठवड्यात पूर्ण होईल. उर्वरित १२ कुटुंबांचे अर्ज अद्याप आलेले नाहीत व 8 कुटुंबांकडून जमीन मागणी अर्ज आलेले आहेत.

बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, एस. आर. पाटील, अमोल नाईक आदी अधिकारी उपस्थित होते.दुधगंगा व सर्फनाला प्रकल्पग्रस्तांची बैठक पुढील आठवड्यात मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, दुधगंगा व सर्फनाला प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्याही काही समस्या आहेत. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल व कार्यवाही होईल.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED