2018 – 19 च्या शिक्षकेत्तर संच मान्यतेनुसार मंजूर पदावर पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे

🔸चंद्रपूर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना ने शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर याना अनेक मागण्या संदर्भात दिले निवेदन

✒️नितीन पाटील(नेरी प्रतिनिधी)

नेरी(दि.6एप्रिल):-सन 2018-19 च्या शिक्षकेतर संच मान्यतेनुसार मंजूर पदावर संस्था स्तरावरून मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्याना मान्यता प्रदान केल्यानंतर समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीसह अनेक मागण्या संदर्भात दि 5 एप्रिला शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद चंद्रपूर याना जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना च्या वतीने निवेदन देण्यात आले
सदर 2018 19 च्या शिक्षकेत्तर संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील कनिष्ठ लिपिक ,वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, प्रयोगशाळा साहाय्यक या पदाचे शाळा व संस्था स्तरावर समायोजन करण्यात आले आहे.

परंतु उर्वरित अतिरीक्त कर्मचाऱ्यांची माहिती शिक्षणाधिकारी यांनी 10 एप्रिल पर्यंत मागितली आहे परंतु माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेला मिळालेल्या माहिती नुसार जिल्हातील अनेक संस्थेने शाळेने सेवानिवृत्ती मुळे रिक्त झालेल्या मुख्य लिपिक ,वरिष्ठ लिपिक ,कनिष्ठ लिपिक,पदावर पदोन्नती देऊन त्यांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर केले आहे परंतु ही सर्व प्रस्ताव प्रलंबित असून त्या प्रस्तावावर अजून पर्यंत मान्यता प्रदान करण्यात आली नाही.

वास्तविक पदोन्नती पद संबंधित शाळेच्या सण 2018 19 च्या शिक्षकेत्तर संच मान्यतेत मंजूर आहेत आणि या प्रकरणाची सर्व माहिती कार्यालयाला दिली आहे तरी जिल्हातील माध्यमिक शाळांतील लिपिकांचे पदोन्नतीचे प्रलंबीत असलेले प्रस्ताव प्रथम निकाली काढून मान्यता प्रदान करावी त्यानंतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची समायोजनाची कार्यवाही करावी अशी मागणी करीत चंद्रपूर जिल्ह्या माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांनी शिक्षणाधिकारी याना निवेदन सादर करीत प्रलंबित प्रस्ताव असलेल्या शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांची यादी सादर केली आहे.

यावेळी निवेदन देताना श्री मोरेश्वरजी वासेकर जिल्हा अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष म रा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना प्रशांत हजारे जिल्हासचिव अशोक पिपळकर जिल्हा कार्याध्यक्ष सुनील झाडे सुभास गेडाम आणि इतरसर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते सदर निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक जी प चंद्रपूर यांच्या वतीने सहाय्यक प्रशासन अधिकारी यांना देण्यात आले

महाराष्ट्र, मागणी, विदर्भ, सामाजिक 

One thought on “2018 – 19 च्या शिक्षकेत्तर संच मान्यतेनुसार मंजूर पदावर पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED