कोरोनाच्या नावावर लावलेले निर्बंधाचा फेर विचार करा-आ. सौ. श्वेताताई महाले पाटील

26

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.6एप्रिल):- गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाने मानवी जीवन धोक्यात सापडले असुन या संकटा सोबतच सुलतानी संकटाने नागरिक त्रस्त आहेत . कोरोनाचा उद्रेक वाढत आहे त्यासाठी प्रशासनाने लॉक डाऊन सदृश्य निर्बंध लावल्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे . त्यामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधाचा फेर विचार करून मजूर , कामगार , व्यापारी , लघु उद्योजक , गॅरेज मालक , सलून , हॉटेलव्यावसायिक तसेच या व इतर छोट्या मोठ्या व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे .

आ सौ श्वेताताई महाले पाटील यांना दि 6/ 4/2021 रोजी चिखली शहरातील व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळाने भेट घेऊन निर्बंध उठविण्याची मागणीच्या अनुषंगाने आ सौ श्वेताताई महाले यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना पत्र लिहून यासंदर्भात निर्बंधाचा सर्व समावेशक फेर विचार करण्याची मागणी केली आहे .
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंध उठविणे कोरोनाचा उद्रेक वाढत असून प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधामुळे जिल्हाभरात आक्रोश सुरू झाला आहे .
अगोदरच कोरोनाचा मार आणि भरीस भर प्रशासनाचा भार अशी परिस्थिती नागरिकांवर उद्भवलेली आहे.

लॉक डाऊन जरी केले नसले तरी लावलेले निर्बंध हे लॉकडाऊनचीच आठवण करून देणारे आहे. शनिवार रविवार या दोन दिवसांचा लॉकडाऊनचा असल्यास नागरिक सहन करू शकतात. परंतू इतरही पाच दिवस लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करताहेत. माझ्या कडे चिखली शहरातील व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटुन गेले आहे . त्यांनी घातलेले निर्बंध उठविण्याची मागणी केली आहे . प्रशासनाने निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार केलेला नाही . या निर्बंधाचा अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थाही यामुळे खिळखिळी होणार आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांतील व्यावसायिक बेरोजगार होणार आहे.

तसेच ट्रान्सपोर्टेशन जरी खुली ठेवली असली तरी गॅरेज आणि स्पेअर पार्टस दुकाने मात्र बंद ठेवण्यात आल्याने वाहने नादुरुस्त झाल्यास स्पेअर पार्ट न मिळाल्याने व दुरुस्ती न झाल्याने ट्रान्सपोर्ट सुद्धा बंद राहणार आहे . कोरोना प्रतिबंध करण्यासोबतच अर्थ कारण बंद होणार नाही , तसेच हातावरच्या पोटावर असणारे मजूर , दुकानांवर काम कामगार , बांधकाम क्षेत्रातील बांधकाम साहित्य पुरविणारे दुकाने बंद झाल्याने बांधकाम मजूर यांची उपासमार होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे .त्यामुळे निर्बंध लावत असतांना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी , व्यापारी , लघु व्यावसायिक तसेच छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करून निर्बंध लावण्याबाबत फेर विचार करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली आहे .