कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानाचे शटर डाऊन

26
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण) मोबा.9075686100

म्हसवड(दि.6एप्रिल):-महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा फैलाव अधिक वेगाने होत असल्याच्या कारणाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा सुपर स्प्रेड रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊनची आदर्श नियमावली आखून दिली व आजपासून ती लागू हि झाली मुख्यमंत्र्यानी राज्यातील जनतेला आवाहन करताना ‘ब्रेक द चेन’ असे सांगितले आणि मिनी लॉकडाऊन जनतेने पण स्वीकारला असताना आज अचानक सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीचा आदेश काढून अत्यावश्यक सेवेतील दवाखाना,हॉस्पिटल,मेडिकल,किराणा,कृषी सेवा केंद्र,शेती अवजारे अशी दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले.

त्यामुळे आज सकाळपासूनच दहिवडी,म्हसवड,गोंदवले अशी गावे काही वेळातच लॉकडाऊन झाली.दहिवडी गावात या आदेशामुळे व्यापारी वर्गात नाराजी पसरली.व्यापाऱ्यानी एकत्र येत पोलीसांशी याबद्दल चर्चा करून नंतर बंदला पाठींबा दिला यावेळी आदेश असताना सुद्धा महामार्गावरील दुकाने उघडी असल्याचे पाहायला मिळाले.आजपासून दि.30 एप्रिल पर्यत जिल्ह्यात दिवसा जमावबंदी व रात्रीची संचार बंदी लागू झाली असून याचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.