श्री गुरुदेव आत्मानुसंधान भु-वैकुंठ अड्याल टेकडी येथील गुढीपाडवा महोत्सव रद्द

(13 एप्रिल 2021भु-वैकुंठ अड्याल टेकडी येथील गुढीपाडवा महोत्सव रद्द.)

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.6एप्रिल):-दि. 13 एप्रिल ला होणाऱ्या अड्याल टेकडी येथे दरवर्षी प्रमाणे साजरा होणारा गुढीपाडवा महोत्सव (कोविड-19) च्या वाढत्या प्रभावामुळे जिल्हा प्रशासन व राज्य सरकारच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेला असून दि. 13 एप्रिल होणारा श्री गुरुदेव आत्मानुसंधान भु-वैकुंठ अड्याल टेकडी येथील गुढीपाडवा महोत्सव,यात्रा व सर्व प्रकारचे सन रद्द करण्यात आले आहेत.

सर्व भाविक भक्त गुरुदेव मंडळींना विनंती आहे की,
सर्वांनी आपापल्या घरीच गुढीपाडव्याचा कार्यक्रम करून गुढीपाडवा साजरा करावा. असे श्री. गुरूदेव आत्मानुसंधान भु-वैकुंठ अड्याल टेकडी येथील भु-वैकुंठ व्यवस्थापन समिती तर्फे जाहिर आवाहन करण्यात येत आहे. त्या करिता भाविक मंडळींनी भु-वैकुंठ अड्याल टेकडी येथे येऊन गर्दी करु नये असे सहकार्य करावे असे गुरूदेव आत्मानुसंधान भु-वैकुंठ अड्याल टेकडी येथील भु-वैकुंठ व्यवस्थापन समिती तर्फे करण्यात आले आहे.

धार्मिक , महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED