भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साठी जिल्हाधिकारी यांना अतिशभाई खराटे यांच्या नेतृत्वात निवेदन

29

✒️मलकापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मलकापूर(दि.7एप्रिल):-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची परवानगी द्यावी व
जनतेवर लादलेले कडक निर्बंध व जमावबंदी आदेश रद्द करावा यासाठी वंचित बहुजन आघाडी वतीने बुलडाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी बुलडाणा यांना उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचेमार्फत निवेदन देण्यात आले.

मागील वर्षी कोविड 19 च्या लॉकडाऊनमूळे शासनाने महापुरुषांची जयंती काढण्यासाठी परवानगी नाकारली होती व सर्व जनतेने तो आदेश मान्य करून जयंती साजरी केली नाही तसेच यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन होणे आवश्यक आहे.त्या अनुषंगाने प्रत्येकाने मास्क वापर करून, शिस्त पाळून, शारीरिक अंतर ठेवून ,कोरोना बाबतीत शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार व जणभावनेचा आदर करून शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची परवानगी द्यावी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वाढत आहे.

त्यामुळे लॉकडाऊनच्या माध्यमातून जनतेवर जबरदस्तिने निर्बंध लादलेले आहेत,सरकार आरोग्य सेवा पुरविण्यास अपयशी ठरत आहे वास्तविक पाहता सरकारने आरोग्य सुविधा वर भर द्यावा व इतर प्रतिबंधात्मक उपाय करावे,या निर्बंधामुळे सामान्य जनता भरडली जात आहे हातावर पोट असणाऱ्याचे हाल होत आहे व लोकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत, गर्दी मुळे कोरोना वाढत असेल तर गर्दी नियंत्रित करण्यासाठी केवळ कडक निर्बंध न लावता जनतेला नियमांचे पालन करण्याचे आवाहन करावे व जनतेवर लादलेले कडक निर्बंध मागे घेऊन जमावबंदी आदेश परत घ्यावा ही मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेप्रसंगी अतिशभाई खराटे जिल्हा महासचिव, भाऊराव उमाळे जिल्हा संघटक, तुळशीराम वाघ जिल्हा सचिव, सुशील मोरे तालुकाध्यक्ष मलकापूर, संजय दाभाडे ता.नेते, शेख यासीन कुरेशी शहराध्यक्ष, विलास तायडे, गजानन झनके, गणेश सावळे, शांताराम सोनोने, मधुकर निकम्, भीमराज मोरे,श्रीरंग शेंगोकार, ज्ञानदेव खराटे, सोपान बिऱ्हाडे,हरीचंद्र गुरचळ,समाधान चव्हाण, दादाराव मोरे, देवराव इंगळे, आर.एन.वानखेडे, पी.डी.पवार, एस.ओ. तायडे, श्रावण झनके, नरसिंग चव्हाण, शांताराम इंगळे, विनोद वानखेडे, सुपडा ब्राम्हणे, देवराव इंगळे, मिलिंद वानखेडे, प्रवीण इंगळे, सुनील दांडगे आदी उपस्थित होते