तुरीची दाळ चोरण्याऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक

27

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.7एप्रिल):-नजीकच्या आजंती शिवारातील गोविंद एग्रो इंडस्ट्रीज या दालमिल मधील तुरीची दाळ चोरण्याऱ्या आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून चोरी गेलेली दाळ व आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने अशी एकूण 6 लाख 35 हजार किमतीचा माल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे .सदर कारवाई डी.बी.पथकाने केली.दालमिलचे मालक सुरज महेशकुमार मोटवाणी रा.हिंगणघाट यांनी त्याचे आजंती सलेल्याच गोविंद ॲग्रो इन्डस्ट्रिज या दालमिल मध्ये ठेवलेल्या तुरीच्या दाळीचे प्रत्येकि 50 किलोचे एकूण 25 पोते एकुण किमंत 1लाख 25 हजार रूपयाची दाळ अज्ञात इसमाने चोरून नेल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसांत केली होती.

सदर तक्रारीवरून पोलिसांनी दि.4 रोजी अपराध क्र. 340/2021 नुसार कलम 380 भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला.
सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने चोरीस गेलेल्या दाळीबाबत शोध घेतला असता दालमिल मध्ये काम करणाऱ्या कामगारांनीच सदर कृत्य केल्याचे उघड़कीस आले. दालमिलमधील मजुर मागील काही दिवसापासुन हिंगणघाट येथील काही लोकांशी संपर्क साधुन दाळीची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्याबाबत अधिक तपास केला असता दालमिलमधेच कामावर असलेले आरोपी शिवनंदि हरीप्रसाद कनोजिया वय 20 वर्षे रा. छिंदवाडा, रवि एकनाथ माहुरे वय 26 वर्षे रा.चंद्रपुर तसेच त्याचे सोबत हिंगणघाट येथील रहिवासी वाहनाचा चालक-मालक प्रज्वल अशोक पितळे वय 20 वर्षे रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट यांनी संगणमत करून दालमिलमधुन तुरीच्या डाळीची चोरी केल्याने त्यांना अटक केली.

पि.सि.आर. मध्ये तपासात निष्पन्न झाले कि, त्यांनी यापुर्वी सुद्धा दोन वेळा तुरीच्या दाळीची चोरी केल्याची माहिती मिळाली.सदर तीनही आरोपी हे दालमिल येथुन तुरीच्या दाळीची चोरी करून हिंगणघाट येथे राहणाऱ्या शेरअली सय्यद रा. हिंगणघाट यास विकली होती.त्यावरून चोरीची दाळ विकत घेणारा आरोपीसह चारही आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमालासह एकुण37 तुरीच्या दाळीच्या बोऱ्या व गुन्हयात वापरलेली झायलो कार क्र. एम.एच. 48-ए.-4686 तसेच टाटा एस मिनीट्रक क्र. एम.एच. 32- क्यु. 3684 असा एकूण 6लाख 35,000 रूपयाचा माल जप्त करण्यात आला.

सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम पोलिस निरीक्षक संपत चव्हाण, सहा पोलीस निरिक्षक पि.आर. पाटणकर यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि.निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर यांनी केली आहे.