प्रेमाला वय नसते,पण जबाबदारी,अहंकार असतो

28

विज्ञान जगात सामाजिक बदल झपाट्याने करीत असतांना समाजातील सर्व जातीपतीच्या घराघरात ज्या काही घटना घडतात त्या जीवनात वादळ निर्माण करणाऱ्या ठरतात, लोक घरात शरीराने एकत्र राहतात पण मनाने नाही.सोशल मीडियावर ही पोस्ट निनावी फिरते आहे.ती अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी आहे मला ती खूप वेदनादायी आणि प्रेरणादायी वाटली म्हणून मी ती वाचका समोर ठेवतो,यांचा मूळ लेखक कोण आहे माहीती नाही,पण जी सत्यपरिस्थिती मांडली ती प्रत्येकाच्या घर घडणारी निश्चितच आहे.कारण प्रेमाला वय नसते,पण जबाबदारी अहंकार असतो.

प्रिया आणि समरच्या लग्नाला आता जवळजवळ तीन वर्ष होत आली होती. Love Marriage च्या जमान्यात त्यांचं Arranged Marriage होतं. सुरवातीला सगळं सुरळीत चालू होत पण नंतर काही ना काही कारणामुळे खटके उडू लागले.प्रिया बँक मध्ये कामाला होती तर समर एका परदेशी कंपनीत.घरात सगळ्या सुखसोयी होत्या.नव्हता तो फक्त एकमेकांसाठीचा वेळ आणि एकमेकांना समजून घेण्याची समज.भांडणाचं कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल तर कधी किचनमध्ये सुरु राहिलेला पंखा.आजकाल तर काहीही क्षुल्लक कारण पुरेस होतं होत. कारण प्रेमाला वय नसते,पण जबाबदारी अहंकार असतो.

आज सकाळीही खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठवून गेला.दोघे एकमेकांशी तावातावाने खूप भांडले नी काही न खाता उपाशी ऑफिसला निघून गेले.आज नवीन महिन्याचा पहिला आठवडा त्यामुळे ऑफिसमध्ये काम भरपूर असणार एखादे वेळेस लंचसाठी देखील वेळ मिळणार नाही हे प्रियाला माहीत होत पण तरी देखील ती तशीच निघून आली.
आज ४ तारीख,म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज पाटील आजी आजोबा पेंन्शन साठी बँकमध्ये येणार.पाटील आजी आजोबा संपूर्ण बँकमध्ये कौतुकाचा विषय होता.दोघे जोडीने नेहमी येत, कडक इस्त्री केलेली कॉटनची साडी आणि तसाच कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट.दोघे सत्तरीच्या घरात होते, पण एकमेकांना खूप सांभाळत होते. दरवेळी येताना बरोबर शबनम बॅग त्यात पाण्याची बाटली, छत्री, बिस्कीटचा पुडा आणि दोघांची डॉक्टरची फाईल न चुकता असे.त्यांच्याकडे बघून प्रिया नेहमी विचार करत असे की आपल्या नशिबात हे सुख का नाही.प्रेमाला वय नसते,पण जबाबदारी अहंकार असतो.

नेहमीप्रमाणे आजोबांनी स्वतःचा फॉर्म भरला नी कॉउंटर वर दिला आणि आजीकडे तिचा फॉर्म घ्यायला वळले आणि नेहमी प्रमाणे आजी रिकामा फॉर्म घेऊन तशीच उभी होती. अगं काय हे, एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला?. आणखी किती वर्ष माझ्याकडून भरून घेणार आहेस, आज शेवटचा भरतो आहे, पुढच्यावेळी तूच भर असू द्या ओ तुम्ही आहात ना, मग मी कशाला चिंता करू? आजीचं गोड हसून उत्तर..थोड्याफार प्रमाणात हा संवाद दर महिन्याचा होता. आज कॉऊंटरवर प्रिया होती,प्रियाच्या हातात फॉर्म देत “बावळट आहेस” आजोबा पुटपुटले आणि आजी लाजली. इथेच थांब, मी मॅनेजरला भेटून येतो, जाऊ नकोस कुठे,हरवशील,वेंधळी आहेस तू. म्हणत आजोबा केबिन कडे गेले.

आजी,अहो इतके बोलतात आजोबा तर शिकून घ्या ना फॉर्म भरायला,त्यात काहीच कठीण नाहीे, प्रिया वेळ काढण्यासाठी बोलली. आजी हसली, अग मला येतो भरता फॉर्म,पण मला तो येत नाही म्हणून ह्यांची होणारी ती प्रेमळ चिडचिड मला आवडते, मी एकटी सगळं करू शकते,पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदारीने करतात ते मला आवडतं,ह्या वयात आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो आणि मग ते स्वतःची काळजी घेतात.मला ते हवं आहे.प्रेमाला वय नसते,पण जबाबदारी अहंकार असतो.
संसारात दोघांनाही दोघांची गरज असते,एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लावून गाडी ओढायची असते.आजी गोड हसली. कॅबिन मधून आजोबा बाहेर आले नी आजी त्यांच्या पाठीमागे चालू लागली.दाराशी येत इथेच थांब मी रिक्षा घेऊन येतो म्हणून आजोबा निघाले नी आजी ने त्यांना मागून हाक मारून छत्री हातात दिली.

सगळा प्रसंग गोड होता, किती प्रेम आहे ना आजींचा आजोबांवर. बाजूला बसलेल्या सरिताला प्रिया म्हणाली अग दोघांचं बोल,आजीला उन्हाचा त्रास होतो म्हणून पाटील आजोबा तिला इथेच थांबवून चालत जाऊन रिक्षा आणतात,नेहमी बॅगमध्ये कोकम सरबताची बाटली घेऊन फिरतात,खूप काळजी घेतात ते एकमेकांची. कारण प्रेमाला वय नसते,पण जबाबदारी अहंकार असतो.प्रियाला सकाळी घडलेला प्रसंग आठवला.समरने काल लवकर आला तेव्हा दोघांसाठी चहा करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा-जेव्हा लवकर यायचा तेव्हा-तेव्हा करत होता. आज समरशी शांतपणे बोलायचं प्रियाने ठरवलं. तिने समरला फोन लावला काही खाल्लस का?.नाही गं आज एक महत्वाची मिटिंग आहे, तू काही खाल्लस का? नाही, चल कामं होत राहतील, काहीतरी खाऊन घे,उपाशी काम करत बसू नकोस,मीही ब्रेक घेते. संध्याकाळी जेवायला बाहेर जायचं ठरवून प्रियाने फोन ठेवला.

हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला, खटके उडत होते पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं. ह्यात तीन-चार महिने गेले आणि आज पुन्हा सकाळी बेडवर ओले टॉवेल बघून प्रियाचा पारा चढला. समरने सॉरी म्हणून टॉवेल उचलला पण तोपर्यंत प्रिया खूप चिडली होती नोकर नाही आहे मी इथे,नाही जमणार मला सारखं ऍडजस्ट करायला, इतका आळशी स्वभाव बरा नाही. रागारागात प्रियाने तयारी केली नी ती ऑफसला निघून गेली.कॉऊंटर वर ती बसली होती आणि तिला दारातून पाटील आजोबा आत येताना दिसले आज ते एकटेच होते आणि पेंन्शनचा दिवसही नव्हता काहीतरी वेगळं काम असेल म्हणून प्रिया पुन्हा आपल्या कामात गुंगली. शिपायाने, साहेबांनी आत बोलावलं आहे हा तिला निरोप दिला.आत पाटील आजोबा बसले होते, प्रिया, पाटील आपल्या बँकचे सगळ्यांत जुने कस्टमर आहेत, त्यांना आज पर्सनली मदत कर,मी दुसऱ्या ब्रँच मध्ये चाललो आहे, त्यामुळे “you can sit here and help him with all the formalities” नायर साहेब निघून गेले. बोला आजोबा काय करायचं आहे. मला सावित्रीचं अकाऊंट क्लोज करायचं आहे,गेल्या आठवड्यात ती हार्टअटॅक नी घरी बसल्या जागी गेली.

कोणीतरी जोरात ओरडल्यावर जसं कान सुन्न होतात प्रियाच तसं झालं. “I am sorry” च्या व्यतिरिक्त ती काहीच बोलू शकली नाही. आजोबा बोलत होते, खूप काळजी घ्याची माझी ती,सगळं वेळच्या वेळी,मी सुरुवाती पासून वेंधळा,पण ती प्रत्येक वेळी माझ्या चुका लपवायची माझ्या पाठीशी कायम उभी राहिली.प्रेमाला वय नसते,पण जबाबदारी अहंकार असतो.
तिला बहुतेक ती जाणार हे कळलं होत,आज पर्यंत तिला कित्येक वेळा मी जेवण करण्यासाठी बाई ठेवू सुचवलं होतं पण तिने कधीच ऐकलं नाही,पण एक १५ दिवसांपूर्वी तिने जेवणासाठी बाई ठेवली तिला मला लागत तसं जेवण शिकवलं,मी तिला चिडवलं देखील की पाटलिण बाई आता बसल्याजागी ऑर्डर देणार.

आजोबांनी डोळ्याला रुमाल लावला,प्रियालाही रडू आवरलं नाही, formalities पूर्ण करून आजोबा निघून गेले.प्रियाच लक्ष फोनकडे गेलं,समरचा मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होत होता….सॉरी प्रिया,मी आज पुन्हा टॉवेल विसरलो, I will try not to do it again, पण यार तू त्यामुळे काही न खाता ऑफिस ला जाऊ नकोस, I feel guilty, please don’t do that again. I have been pampered, spoiled brat till date and I m trying to change that, please give me time to change myself, I promise I will change, I never have said this before but I always want you in my life, No one can understand my mood the way you do, Please”
काहीवेळ Priya फोन कडे बघत राहिली आणि तिला पाटील आजीच वाक्य आठवलं “आपल्यावर कोणी तरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो.” संसारात दोघांनाही दोघांची गरज असते, एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लावून गाडी ओढायची असते. कारण प्रेमाला वय नसते,पण जबाबदारी अहंकार असतो
प्रियाने reply केला.. “sorry, I too loose my control every now and then, I will also try to work on it, you too please give me time for that, I too always want you to be their in my life, you are my entire support system and we both will work towards understanding each other”..

तात्त्विक भांडण सर्वांशी होते,पण “राग” कायम कुणाशीचं ठेवू नये..खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात,जरूर असावेत,पण मनात कायम “भेद” ठेवू नये.. एखाद्याशी “वाद” घालावा, पण वादावादी न करता क्षणात “सुसंवाद” साधावा. “अहंकार” हाच या सर्वाचं मूळ आहे,तो विनाकारण “बाळगून जगू” नये..शेवटी “मृत्यू” हे सुंदर शाश्वत वास्तव आहे, त्याचे “स्मरण” असावे “भय” नसावे. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा “आनंद” उपभोग घेण्यासाठी याचे “स्मरण” ठेवू या.आपण किती आनंदात आहोत, त्यापेक्षा आपल्यामुळे कितीजण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे. “एक हृदय” घेऊन आलोय जाताना लाखो हृदयात जागा करुन जाता आलं पाहिजे.. क्षमा करा,प्रेम द्या,प्रेम घ्या. कारण प्रेमाला वय नसते,पण जबाबदारी अहंकार असतो.हे प्रत्येकानी लक्षात ठेवावे.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप मुंबई