जिल्हा संकुलाचे कामाला गती द्या – विद्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यश दत्तात्रय

25

🔹कामाची गती समाधानकारक नसल्याने क्रीडा मंत्र्यांकडे तक्रार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.7एप्रिल):- जिल्हा क्रीडा संकुल अद्यावत करण्याची मागणी चंद्रपूरकरणी केली होती. त्याची दखल घेत २६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातील १२ कोटी रुपये एका वर्षाआधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते करण्यात आले होते. परंतु एक वर्ष लोटून देखील काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे या क्रीडा संकुलातून राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर तयार होणारे खेळाडू हे सरावापासून वंचित आहे. त्यामुळे कामाची गती वाढवून खेळाडूंच्या सेवेत हे क्रीडा संकुल लवकर उपलब्ध करून देण्याची लोकहितकारी मागणी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यश दत्तात्रय यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर क्रीडा संकुलात मोठ्या प्राणात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सामने घेण्यात येते. १९९३ – ९४ ला खासदार निधीतून हॉस्टेलचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास २६ रूम आहेत. परंतु त्या सध्या जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे बाहेर गावच्या खेळाडूंना राहण्यासाठी नाहक त्रासाला समोर जावे लागते. अनेकदा या रुमच्या काही भाग खचल्याने खेळाडू जखमी देखील झाले. त्यामुळे हे हॉस्टेल नव्याने बांधण्यात यावे. मागील २० वर्षांपूर्वी व्यायामशाळा बांधण्यात आली होती. परंतु कालांतराने त्यातील साहित्य कालबाह्य झाले. ते देखील अत्याधुनिक करण्यात यावी. या परिसरातील सुमारे सहा हजार नागरिक वाकिंग करीत असतात. परंतु त्यांच्यासाठी स्वत्रांत वाकिंग ट्रक आवश्यक आहे. ते बांधण्यात यावे.

महिला व पुरुष खेळाडूकरिता या परिसरात वाशिंग रूम व चेंजिग रूम बांधण्यात यावे, या संकुलाची देखभाल करण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्यामुळे कर्मचारी ठेवायचा कसा असा प्रश्न नेहमी पडत असतो. त्यामुळे आर्थिक संकट दूर करण्यासाठी मुख्य रस्त्यावर व्यापारी संकुल उभारणे, या संकुलाची सौरक्षण भिंत जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी पडलेली आहे. त्यामुळे जनावरे आत जाताना दिसून येत आहे. केटिंग ट्रकची सुधारणा करण्यात यावी, यासोबतच अन्य लोकहितकारी मागण्यांकडे विद्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यश दत्तात्रय यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांचे लक्ष वेधले. येत्या काळात हे अत्याधुनिक क्रीडा संकुल राहील. तात्काळ संबंधित विभागाला कामाची गती वाढणाऱ्यांचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी युवा काँग्रेस माजी लोकसभा अध्यक्ष शिवा राव, युवक काँग्रेस प्रदेश सचिव सचिन कत्याल, विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव कुणाल चहारे, तुषार पडवेकर, शंतनू सातपुते, श्रद्धेय मत्ते, यांची उपस्थिती होती