बळसाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करा – महावीर जैन

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

बळसाणे(धुळे)(दि.7एप्रिल):- बळसाणे, कढरे, आगरपाडा व सतमाने या गावातील नागरिक भितीमुळे दुसाणे येथील लसीकरण केंद्रावर जाण्याचे टाळत असल्याचे व या उपकेंद्राला २९ गावांचा समावेश असल्याने कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या पाहता नागरिकांना जाणे शक्य होत नसल्याचे बळसाणे येथील उपसरपंच महावीर जैन यांनी सांगितले. कोव्हिड चा वाढता प्रादुर्भाव पाहता भितीने कोणीही घरदार सोडून जात नसल्याने संबंधित आरोग्य विभागाने बळसाणे येथे लसीकरण केंद्राची मोहीम राबवावी. या आशयाची मागणी शिवसेनेचे आरोग्य सेवक महावीर जैन यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

जैन यांनी प्रसिद्धी पत्रात असे म्हटले आहे की काही नागरिकांना स्वतःचा प्रकृती बाबत बाळगलेला फाजील आत्मविश्वास, कोरोना प्रति, हलगर्जीपणा, मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स चे आजिबात पालन न करणे, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. व कोरोना लसीकरण सर्वत्र सुरू असले तरी कोरोना हा महामारी चा प्रसाराला रोखण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्तीत जास्त लसीकरण होणे. हे गरजेचे आहे यामुळे बळसाणे, कढरे, आगरपाडा व सतमाने हे गाव बळसाणे गावापासून काही अंतरावरच आहे. व चार ही गाव मिळून साधारणतः हा परिसर वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या असल्याने आरोग्य खात्याने बळसाणे गावात लसीकरण केंद्र त्वरित सुरू करूण कोरोना लसीकरण मोहीम राबवणे. हा एक अत्यंत परिणामकारक उपाय ठरणार असल्याचे जैन यांनी सांगितले.

भिती मुळे नागरिक बाहेर जाणे टाळत आहेत. बळसाणे गावात लसीकरणाच्या मोहिमेत समाजातील विविध संस्थांचाही सहभाग घ्यावा. व शंभर टक्के लसीकरण झालेले गाव म्हणून वेगळी ओळख होईल आणि कोरोना चा आलेख खाली जाण्यास सुरुवात होईल कोव्हिड चे प्रमाण वाढणार नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने निर्णय घेऊन संबंधित आरोग्य विभागाला पुढील आदेश लवकर द्यावेत अशी मागणी बळसाण्याचे महावीर जैन यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

 

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED