विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवा : यश दत्तात्रय

24

🔸राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल जाहीर करा

🔹विद्यार्थी काँग्रेस चे राज्यपालांना निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.7एप्रिल):- जिल्ह्यातील नव्हे तर एकेकाळी विदर्भातील एकमेव नावाजलेले राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय होते. कालांतराने गोंडवाना विद्यापीठ स्थापन झाल्यापासून गडचिरोली व चंद्रपूर येथील शिक्षण व्यवस्थेचे बारा वाजल्याचे दिसून येत आहे. या महाविद्यालयातील ३५० विद्यार्थ्यंचे निकाल विद्यापीठाने प्रलंबित ठेवले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नोकरी मागायची कशी असा प्रश्न पडला आहे. या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यपालांनी हस्तपसेप करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यश दत्तात्रय यांनी केली आहे.

अभियांत्रिकी शाखेत चंद्रपूर येथील राजीव गांधी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील गोंडवाना विद्यापीठातील हि शेवटची तुकडी आहे. यात जवळपास ३५० विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे या सर्व विध्यार्थ्यानी परीक्षा शुल्क व इतर सर्व महाविद्यालीन प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. परीक्षा देखील या विध्यार्थ्यानी दिल्या आहेत. परंतु विद्यापीठाने अद्याप निकाल प्रलंबित ठेवलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अद्याप अंधारात असल्याचे चित्र आहे. यातील अनेक विद्यार्थी हे गरीब परिवारातील आहेत. त्यांना हे पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोध घेणे गरजेचे होते. परंतु आता नोकरी मागायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

हा गोंडवाना विद्यापीठांच्या चुकीने प्रश्न निर्माण झालेला आहे. निकाल रोखण्यामागे जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात कामा नये. हा गंभीर प्रश्न असून यात स्वतः राज्यपाल महोदयांनी लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती निवेदनाच्या माध्यमातून काल मंगलवारला विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांनी केली आहे.