त्या असाह्य पीडीतेस न्याय कधी मिळनार ? चंद्रकांत खंडाईत

24

✒️सचिन सरतापे(म्हसवड-माण)मोबा.9075686100

म्हसवड(दि.7एप्रिल):-त्या असाह्य पीडितेस न्याय द्यावा.याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन वंचित बहुजन आघाडी तर्फे छेडण्यात आले.तेव्हा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत बोलत होते.पुसेसावळी, ता. खटाव या तालूक्यातील, औध पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या एका मोठ्या गावामध्ये एक मागासवर्गीय असाह्य असे कुटूंब पालाच्या कुटीमध्ये राहत आहे. मिळेल ते काम करून आपले जीवन जगत असतानाच कुटूंबातील अल्पवयीन मुलीवर आचानक १४ फेब्रूवारी रोजी आघात झाला. त्यामुळे तिला उपचारासाठी काँटेज हाँस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते. शिवाय, आज अखेर आरोपी मोकाट आहे. जिल्ह्यातच गृह राज्य मंत्री असताना सुद्धा या असाह्य पीडीतेला न्याय मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशीही माहिती जिल्हध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिली आहे.

पीडीत कुटूंब अनेक दिवसापासून मोलमजूरी करून आपले जीवनमान जगत आहेत. कुटूंबामध्ये वयोवृद्ध आई व ५ वी’मध्ये शिक्षण घेत असणारी मुलगी असे मागासवर्गीय असाह्य कुटूंब एका पालात राहत आहे. या आल्पवयीन मुलीवर अचानक १४ फेब्रुवारीला अमानवी आघात झाल्याने पीडीतेस कराड येथील काँटेज हाँस्पीटल’मध्ये ऍडमीट करण्यात आले होते. त्यानंतर आचानक हाँस्पीटलमधून कोणताही डीसचार्ज न घेता पीडीतेस १५ फेब्रुवारीला औध पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यानंतर औध पोलीस स्टेशन’ला १३ मार्च रोजी गुन्हा दाखल केल्याचे दिसून येते. या कालखंडात पीडीत मुलीस व कुटूंबास कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही. आरोपी मात्र मोकाट फिरत असल्याने पीडीत कुटूंब पूर्णता: भयभीत अवस्थेत आपला जीव मूठीत घेऊन जगत आहेत. याची कोणतीही दखल घेतली नसल्याचे समोर येत आहे.

सदर पीडीत कुटूंब दहशतीखाली आणी भेदरलेल्या परिस्थितीत आढळून आले आहे. याबाबत डीवायएसपी यांना विचारना केली असता पीडीत कुटूंब बोलत नसल्यानेच आम्ही आरोपीस अटक केली नसल्याचे सांगीतले जात आहे. ही बाब फारच गंभीर असून याबाबत पोलीस प्रशासन गंभिर नाही. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. तेव्हा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पीडीतेस संरक्षन द्यावे. त्यांना न्याय द्यावा. अन्यथा,आपल्या राजीनाम्याच्या मागणीसह तीव्र आंदोलन करावे लागेल.असाही इशारा देण्यात आला आहे. तसेच हा घटनाक्रम पाहता घडलेल्या घटने पासून ते आज आखेर ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत. त्याचा व आज अखेर गुन्हेगारांना पकडण्यामागे काय कारण आहे ? तसेच या पीडीत कुटूंबास चावडीवर बोलावून अनेक प्रश्न विचारल्याचे सुद्धा दबक्या आवाजात चर्चा आहे.

मात्र, या गरीब मागासवर्गीय असाह्य कुटूंबाच्या बाजूने कोणीही पुढे येताना दिसत नाही. त्यामूळे या सर्व घटनाक्रमाची सखोल चौकशी करून दोशीवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक,दक्षता समीतीचे अध्यक्ष जिल्हाधीकारी,सचिव समाज कल्याण अधीकारी व महीला बाल कल्याण समीती यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पीडीत कुटूंबास संरक्षणाची हमी देऊन गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करण्यासाठी उचीत कारवाई करावी.अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी आप्पा सातपुते, जिल्हासचिव गणेश भिसे व सुनील कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.