सुप्रसिद्ध साहित्यिक कृष्णकुमार निकोडे यांना पत्नीशोक

27

🔹कोरोना संसर्गाने निरंकारी संत सेवादार आशाताई निकोडे ब्रह्मलीन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.7एप्रिल):- अख्ख्या महाराष्ट्रास सुपरिचित असलेले प्रसिद्ध साहित्यिक कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी यांच्या पत्नी अर्थात निरंकारी सेवादार व महान संत आशाताई कृष्णकुमार निकोडे (४९) या कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या कारणाने ब्रह्मलीन झाल्या.सेवादार व महान संत आशाताई कृष्णकुमार निकोडे यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली.

दि.०३ एप्रिल २०२१ रोजी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल केले होते. त्याच दिवशी याच रुग्णालयात साहित्यिक निकोडे यांचे धाकटे भाऊ गिरिधर गोविंदा निकोडे (४०) रा.पिसेवडधा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासही त्यांना हजर राहता आले नव्हते. अगदी तीनच दिवसात ही दूसरी दुःखद घटना घडली. संत सेवादार आशाताई निकोडे या दि.०६ एप्रिल २०२१ रोजी रात्री ११ वा.च्या सुमारास सर्वांना शोकसागरात लोटून ब्रह्मलीन झाल्या. कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

संत आशाताई या नेहमी सत्संग व इतर आध्यात्मिक कार्यात हिरीरीने व सेवाभावनेने सहभाग घेत असत. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा, खुप मोठा आप्तपरिवार व सत्संगी संतपरिवार आहे. परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो. कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यास बळ देवो, हीच निरंकार प्रभूचरणी विनम्र प्रार्थना !संत आशाताईच्या पार्थिवावर कोरोना संबंधीचे सर्व शासकीय नियम पाळत स्थानिक कठाणी नदीघाटावर दि.०७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९-३० वा. सर्व आप्त स्वकियांच्या उपस्थितीत भडाग्नी देण्यात आला.