नाभिक समाजाची होत आसलेली परवड थांबवा – सुरवसे

31

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधि)

तलवाडा(दि.8एप्रिल):-देशाच्या राजधानी दिल्ली सह देशात व राज्यभरात कोविड 19 मुळे २२/३/२०२० रोजी लाॅकडाउन लावण्यात आल्याने प्रतेक समाज घटकावर मोठ्या प्रमाणात ऊपासमारीची वेळ आली होती प्रतेक व्यक्ति आर्थिक संकटात सापडला होता. मधील काही कालावधी सोड पकड सुरु आसतांनाच परत सेकंड लाॅकडाउनची वेळ प्रतेक समाज बांधवानसाठी विवीचनेची वेळ असुन आज विविध जाती धर्माच्या नागरिका प्रमानेच नाभीक समाज गत लाॅकडाउन पासुन आज पर्यंत व्यावसायिक दुकाने बंद आसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक आडचणीत सापडल्याने मोठ्या प्रमाणात परवड होऊन संकटात सापडल्यान राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदन देण्यात आले.

असुन या निवेदनात मराठवाड़ा संपर्क प्रमुख महादेव सुरवसे यांनी नाभिक समाजाच्या व्याथा मांडतांना सांगीतले की शासन व प्रशासन नागरीकांचे हित लक्षात घेऊन कोविड 19 च्या संदर्भात लाॅकडाउनचा निर्णय घेत असुन तो योग्य पण आहे. परंतु गत लाॅकडाउन मध्य या निर्णयाने नाभिक समाजाचे राज्यभरात व्यावसाय बंद राहिल्याने आर्थिक अडचण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात समाजावर ऊपासमारीची वेळ आली.

तीच स्थिती या वेळी ऊदभवल्यामुळे मा. जिल्हाधिकारी साहेबांनी सदर बाबीची दखल घेऊन काही प्रमाणात वेळेचे बंधन टाकुन दुकानास चालु करण्यास परवानगी द्यावी नसता प्रतेक नाभिक समाजातील व्यावसायिकांना प्रतेकी २०.०००/-रु. मदत करावी आस्या प्रकारची विनंती जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातुन राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे मराठवाड़ा संपर्क प्रमुख महादेव सुरवसे यांनी केली आहे.या वेळी निवेदन देतांना महादेव सुरवसे, लक्ष्मण दळवी, दत्ता मस्के, आशोक सुरासे, शेख आतीखभाई उपस्थिति होते.