लोहारा येथे अचानक लागलेल्या आगीत झोपडी जळुन खाक

19

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.8एप्रिल):- वरून जवळ असलेल्या लोहारा येथील खेमराज खोब्रागडे यांची झोपडी जळुन खाक झाली यात त्यांचे खुप मोठे नुकसान झाले असून अन्न धान्य वस्त्र संपूर्ण जीवनावश्यक वस्तू आगीत भसम झाल्या त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबियावर आभाळ कोसळले आहे.सकाळी पहाटे 7,45 वाजता अचानक गावात आगीचा डोंब उसळला त्यामुळे गावकरी धुराच्या दिशेने धावू लागले आग आग म्हणत सर्व जण पाणी घेऊन धावू लागले आणि आग विजवू लागले आग आटोक्यात येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

कारण लोहारा हे गाव दाट वस्तीचा असून लागून असलेली घरे थोडक्यात बचावली आणि गाव पेटता पेटता वाचले या आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विजवण्यासाठी परिश्रम घेतले आगीत संपूर्ण झोपडी जळाली असून राखरांगोळी झाली यात खूप मोठे नुकसान झाले असून खेमराज खोब्रागडे याना आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे