interpretation Center ची पूर्तता व अग्निशमन दलाची नाहरकत न घेता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या विकासकाला जेरबंद करावे

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.8एप्रिल):- पॉकेट क्रमांक ९, “ए” व “बी” विंग मधील पोडीएम व तळघरासाठी अग्निशमन दलाची नाहरकत ना घेता प्रशासणाची दिशाभुल व फसवणूक करून भोगवटा प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विकासक विमल शहा ला तात्काळ जेरबंद करण्यात यावे अशी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिआ डेमोक्रॅटिक डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

पॉकेट क्रमांक ९ सारीपुत नगर येथे १८८६४ स्वेअर मीटरचा प्लॉट असून येथे झोपडीपट्टी सुधार योजना अंमलात येत आहे. येथील विकासकांच्या इफएसआय च्या इमारती मध्ये “ए” व “बी” विंग मध्ये वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या पोडीएम व तळघरासाठी अग्निशमन दलाची नाहरकत न घेता व याच इमारती मध्ये इंटरप्रेटेशन केंद्राची पूर्तता न करता, विकासकाने भोगवटा प्रमानपत्र प्राप्त केले आहे.

शिवाय याच इमारतीच्या “सी” विंग मध्ये ६व्या मजल्यावर सदनिकांना अद्यापही भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले नसतानाही येथे नागरिकांचे वास्तव्य दिसून येत आहे.

एमआयडीसी प्रशासणाची दिशाभूल करून भोगवटा प्रमाणपत्र मिळवून सदनिकांची विक्री करण्यात आली आहे. “सी” विंग मधील भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त ना झालेल्या सदनिका विक्री तात्काळ आपल्या मार्फतीने थांबवावी.

विकासक विमल शहा व मास्टर माईंड महादलाल मुर्जी पटेल यांना शासनाच्या प्रकल्पात चोरी करणे थाम्बवून या महाचोरांना जेरबंद करण्यात यावा अश्या आशयाची तक्रार फो. राजन माकणीकर व कॅ. श्रावण गायकवाड यांनी एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस प्रशासनाला केली आहे.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED