लाॅकडाउन मुळे असंख्य गोरगरिब, कष्टकरी, सर्वसामान्य व्यापारी कर्ज बाजारी होऊन मृत्युच्या दारात उभे आहेत- सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर

36

🔹कोरोना सोबत लढण्यासाठी लाॅकडाऊन हा एकमेव हा पर्याय आहे का?

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(8एप्रिल):-केल्या काही महिन्यापासून देशासह राज्यात कोरोना बांधित रूग्णाची संख्या वेगाने वाढत असल्याने, ही साखळी तोडण्यासाठी,राज्यात शासनाने लाॅकडाऊन चे (कडक निर्बंध ) लागू केले आहेत यामुळे गोरगरीब,कष्टकरी,मजुरदार,
सर्वसाधारण शेतकरी,सर्वसामान्य व्यावसायिकांचे जगणे असह्य झाले,अजुन लाॅकडाऊन मुळे असंख्य गोरगरिबांना उपासमारीचा सामना करावा लागत असून आज हा सर्वसामान्य वर्ग पुर्णपणे कर्ज बाजारी झालेला आहे,जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झालाअसुन, याची दखल केंद्र आणि राज्य सरकारने गांभिर्याने घ्यावे, लॉकडाउन लावाच पण लाॅकडाऊन लावण्याआधी या समस्यांचा सरकारने पुर्णपणे विचार करावे.

गोरगरीब असलेल्या घरगुती विजधारकांची सुरवातीच्या लाॅकडाऊन पासुन ते आजपर्यंतची व पुढे होणाऱ्या लाॅकडाऊन पर्यंतचे पुर्णपणे विजबिल माफ करावे.प्रत्येकाला किमान सहा महिने पुरेल इतके तांदूळ,डाळ, मीठ, मसाला, तेल हे घरोघरी पोहच करावे,किमान खिचडी भात बनवून खाता येईल, पंच पक्वनांची अपेक्षाच नाही, लोकांचे जे काही लोनचे हप्ते सुरू आहेत उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज,वयक्तिक कर्ज ह्या लोकांनी कसे भरावे ह्या साठी विचार करण्यात यावा,सर्व साधारण लोक भाड्याने रूम घेऊन राहातात तो किराया कसा भरावा,
तसेच ज्या लोकांनी किरायाने (भाड्याने) घेऊन उदा, दुकान,हातगाडा,ऑटोरिक्षा,ईतर सर्व क्षेत्रात आपले छोटे,मोठे व्यवसाय चालू करून आपली रोजी रोटी कमावणाऱ्या इतर सर्वसाधनांची भाडे कसे भरावेत.

माय बाप सरकार तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा, गोरगरिब ,कष्टकरी, मजुरदार, शेतकरी, व ईतर बांधव ह्या कोरोना विषाणू संकटा पेक्षाही,ज्यास्त भयानक आर्थिक संकटात सापडलेला आहे,बचत गटाची वसूली हप्ते पुढे ढकलावी,या सर्व गोष्टींचा विचार करून आणि लोकांचे सिबील स्कोर खराब होणार नाही हेही जाहीर करावे.आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माजी आमदार खासदार मंत्री यांची पेंशन योजना कायमची बंद करा व चालू आमदार खासदार मंत्री यांची पगार जो पर्यंत लाॅकडाऊन आहे.

तोपर्यंत बंद करा जे सरकारी नोकर आहेत त्यांची जेवढे दिवस काम केले त्यांना तेवढाच पगार द्यावा,शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्यामुळे शेतमालाला रास्त भाव द्यावा,भाव ठरविण्याचा अधिकार शेतकर्यांना द्यावा,कोणत्या दलाला नको,आणि काय करायचा तो लॉकडाउन करा, जनतेला तरी कुठे हौस आहे जीव धोक्यात घालून बाहेर पडायची. आणि हे सगळं जमत नसेल तर आहे तसं आम्हाला जगू द्या,उगाचच आमच्या अडचणी वाढवू नका.जबाबदारी घेता येत नसेल तर उपदेशाचे डोसही पाजू नका,असे मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी मांडले आहेत,