दहिवडी येथे एन.एम.एम्.एस.परीक्षा कोविडं 19 ची दक्षता घेऊन सुरळीत पार

33

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड,माण)मोबा.9075686100

म्हसवड(दि.8एप्रिल):-महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता कहर पाहता इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विध्यार्थ्यासाठी असणारी एन.एन.एम.एस. परीक्षा कोविडं 19 च्या पार्षवभूमीवर सुरळीत पार पडली परशुराम महादेव कन्या विध्याल य व महात्मा गांधी विध्यालय दहिवडी,ता.माण,जी.सातारा येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा घेणेत आली.

त्यावेळी परीक्षार्थी विध्यार्थी यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना गेटवरच विध्यार्थ्याची थर्मल स्केनिग करून हात सेनिटायजरने धुऊन आणि टेम्परचर तपासणी करूनच विध्यार्थ्याना गेटमधून आत प्रवेश देणेत आला.यावेळी सदर विध्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि सर्व कर्मचारी वर्गाने विशेष काळजी घेत परीक्षा सुरळीत कशी पार पडेल याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली.