माजी आमदार तृप्ती सावंत यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सदिच्छा भेट

29

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.8एप्रिल):- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची बांद्रा मतदार संघाच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. शिवसेनेतुन बाहेर पडलेल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी आज बांद्रा पूर्व येथील संविधान निवासस्थानी केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यांना ना रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या , पुढील विधानसभा निवडणुकीत तृप्ती बाळा सावंत या निश्चित विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी रिपाइं चे सुमित वजले; सचिन कासारे ; अमित तांबे आदी अनेक रिपाइं चे पदाधिकारी उपस्थित होते.