डेमोक्रॅटिक रिपाईच्या पँथर डॉ. राजन माकणीकर यांची महामंडळावर वर्णी (?)

25

🔹पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिफारस

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.9एप्रिल):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांना महामंडळावर अध्यक्ष पदी निवड करण्याची शिफारस पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र पाठवून सदरची मागणी केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रवादी काँग्रेस चा एक घटक पक्ष म्हणून भूमिका बजावत असून रिपाई डेमोक्रॅटिक ला सत्तेत सामावून घेण्यासाठी विविध महामंडळावर अध्यक्षपदासाठी डॉ. राजन माकणीकर यांची नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस केली आहे.

डॉ. राजन माकणीकर वयाच्या १४ वर्षापासून शिवराय फुले शाहू आंबेडकरी व पँथर चळवळीत भरीव असे कार्य केले असून त्यांची पँथर चळवळतीत आक्रमकता उल्लेखनीय अशी आहे.

कवी, लेखक, साहित्यिक, पत्रकार व चारोळीकार डॉ. राजन माकणीकर यांना समाजभूषण, समाजचेतना, महाराष्ट्र गौरव, ग्रेट पँथर अश्या शेकडो अवॉर्ड नी विविध सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे.

भारतीय संविधान सर्व राज्यांच्या मातृभाषेत शालेय अभ्यासक्रमात शिकवणी साठी समाविष्ठ करण्यात यावे यासाठी ते मागील १४ वर्षापाडून प्रयत्नशील आहेत.
“गाव तिथे संविधान चौक” अशी त्यांची संकल्पना असून मुंबई गोरेगाव, एस.एस. पाटकर महाविद्यालयात डॉ. माकणीकर यांनी स्वयंखर्चाने येन.एस.एस च्या माध्यमातून संविधान उद्देशिका स्तंभ उभारला आहे.

५ संविधान उद्देशिका स्तंभ, ३ संविधान चौकाची उभारणी केली, १ लाख संविधान पुस्तिका मोफत वितरित केल्या असून उद्देशिका फ्रेम जवळपास लाखोंच्या वर मोफत वाटप केल्या आहेत.

२५ वेळा रक्तदान केले असून मरणोत्तर नेत्रदान शरीर व अवयव दान केले असून लवकरच मोफतऔषधोपचार व ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे.

आजपर्यंत ५ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करूम दिला आहे तर ३ हजार च्या वर युवकांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंरोजगाराकडे आकर्षित केले आहे.

कोविड काळात स्वयंप्रेरणेने अन्नवाटप केले शिवाय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोंनाग्रस्त इमारती व परिसर सील करण्यात विनामूल्य सेवा केली आहे. कोविड रुग्णांना कोविड सेंटर मध्ये भरती करण्यापासून ते त्यांना कोरेनटाईन करण्यापर्यंत त्यांनी यशस्वी भूमिका पार पाडली आहे.

पत्रकारीच्या माध्यमातून मूक-बधिर प्रकरणाचा वाचा फोडून आरोपीला कडक शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळवून देण्याचे कार्य डॉ. माकणीकर यांनी केले असून आजही त्यांची लेखणी अन्याय अत्याचारा विरोधात निडर पने लिहिते, जीवाची पर्वा न करता न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. माकणीकर सर्वसामान्यांना परिचयाचे आहेत.

डॉ. माकणीकर यांची सामाजिक व धार्मिक क्षेत्रात भरीव अशी कामगिरी असून देशसेवार्थ लष्करात विनामूल्य सेवा देण्याची त्यांची अंतिम इच्छा असल्याचेही आमच्या प्रतिनिधींशी त्यांनी बोलतांना सांगितले.

कॅ. श्रावण गायाकवाड, विनोद विधाटे, वसंत लांमतूरे, शंकर माने , सिद्धार्थ गायकवाड, श्रीधर गुडध्ये व बळवंतराव पाटील यांची सुद्धा महामंडळावर विविध पदाच्या नियुक्ती साठी शिफारस केली आहे.